कॅाफी विथ करणच्या पुढील भागामध्ये बॅालिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि रवी किशन आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून कॅाफी विथ करणच्या शेवटच्या सीझनमध्ये अनेक मोठे बॅालिवूडचे सेलिब्रेटी या सिझनमध्ये आतापर्यत सहभागी झाले होते. आता आगामी एपिसोड आणखी धमाकेदार असणार आहे. दोघेही उत्कृष्ट अभिनेते आणि विनोदी कलाकार आहेत. त्यांना करणच्या शोमध्ये पाहणे रोमांचक असेल. शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये या दोन स्टार्समधील खेळकर आणि विनोदी संवाद दाखवण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये करण जोहरने आता एक इंटीमेसीवाला प्रश्न अक्षर कुमार केला आहे, यावर अभिनेत्याने काय उत्तर दिले यासंदर्भात सविस्तर वाचा.
करणने अक्षयला रोमान्सबद्दल एक प्रश्न विचारला, ज्याचे अभिनेत्याने मनमोकळेपणाने उत्तर दिले. करणने त्याला विचारले की, तो एक वर्ष इंटीमेसीशिवाय राहणे पसंत करेल की वर्कआउटशिवाय? अक्षयने उत्तर दिले, "तुमच्या मते, इंटीमेसी हा सर्वोत्तम व्यायाम नाही का?" तो अभिनेता खळखळून हसला. रवी किशनसुद्धा खळखळून हसले. कलाकारांची ही मनोरंजक बाजू पाहून लोकांना आनंद झाला आहे. सेलिब्रिटींनीही या 'कॉफी विथ करण'च्या प्रोमोवर प्रतिक्रिया देत, तो पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा शो बुधवारी संध्याकाळी 7 वाजता जिओ हॉटस्टारवर प्रसारित होईल. करणच्या शोमधील अक्षयची ही पाचवी पाहुणी भूमिका असेल, तर रवी किशनची ही पहिलीच असेल.
हे ही वाचा
रवी किशनने 'कॉफी विथ करण'च्या सेटवर आपला डान्स सादर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय बनला. जेव्हा अक्षय कुमारने रवी किशनला सांगितले की त्याला त्याचा डान्स शिकायचा आहे, तेव्हा रवी किशननेही आपला डान्स सादर केला. करण जोहरच्या शोमध्ये खाजगी प्रश्न विचारले जात नाहीत, असे कधीच घडलेले नाही. करण जोहरने या मुद्द्यावरून अक्षय कुमारला कोंडीत पकडले आणि त्याला विचारले की, एक वर्ष व्यायाम न करणे आणि एक वर्ष सेक्स न करणे, यापैकी तू काय निवडशील? यावर अक्षयने दिलेले उत्तर कदाचित करण जोहरलाही अपेक्षित नव्हते.
The Khiladi No. 1 and the King of Virality together? Entertainment follows, my brother! Koffee with Karan Season 9, Episode 7, streaming Wednesday at 7pm, only on The Peacock Hub on JioHotstar. #KaranJohar @AdarPoonawalla @apoorvamehta18 @aneeshabaig #NishantNayak @manumaharshi @Dharmatic_
— JioHotstar Reality (@HotstarReality) November 21, 2026
रवी किशन यांचे कौतुक करताना अक्षय कुमार म्हणाला, "मला त्यांची विनोदी बाजू माहीत आहे, पण ते खरंतर खूप भावनिक व्यक्ती आहेत." चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासावर आणि या स्थानापर्यंत पोहोचण्यावर विचार व्यक्त करताना रवी किशन म्हणाले, "लोक चालत चालत इथे पोहोचतात. मी स्वतःला ओढत नेत इथपर्यंत पोहोचलो आहे."