SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'त्या' एका वाक्यामुळे केला टायगर श्रॉफवर हल्ला, आरोपीचा खळबळजनक खुलासा! सलमान खानशी असलेलं हल्ल्याचं थेट कनेक्शन 7 दिवसांनी समोर

18 ऑक्टोबर रोजी, टायगर मुंबईमधील फुटबॉलच्या मैदानावरून बाहेर पडताच तिन्ही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर घडली. या प्रकरणात 10 दिवसानंतर समोर आली खळबळजनक माहिती...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 25, 2026, 08:45 IST | Updated: Oct 25, 2026, 09:13 IST
Image Credit: आरोपीनेच सांगितलं कारण (फोटो सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
Join

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 11 व्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलीस गेल्या रविवारपासून टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सखोल तपास करत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील अनिल पंडितने या हल्ल्याच्या जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेले तीन आरोपींना कोटा येथून जयपूरच्या दिशेने जाताना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्व आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागले. या आरोपींच्या चौकशीदरम्यान तपासात 17 वर्षीय आरोपीने टायगरलाच का लक्ष्य करण्यात आलं हे सांगितलं आहे. 

...म्हणून 'हिट लिस्ट'वर टायगर

या अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले की, 2022 मध्ये सलमान खानचं कौतुक केल्यापासून टायगर श्रॉफ बिश्नोई टोळीच्या 'हिट लिस्ट'वर होता. या अल्पवयीन आरोपीच्या दाव्यानुसार, 'हीरोपंती 2'च्या प्रमोशनदरम्यान टायगरने सलमान खानबद्दल केलेल्या विधानाचा राग डोक्यात ठेवूनच त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं या आरोपीने सांगितलं आहे. 

टायगर श्रॉफवर हल्ला का झाला?

टायगरवरील या हल्ल्यामागचा नेमका उद्देश मला माहीत नव्हता, असं चौकशीदरम्यान या अल्पवयीन आरोपीने सांगितल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरने सलमानचं कौतुक केल्याने त्याच्या याच विधानांसाठी बिश्नोई टोळीला त्याचा 'बदला' घ्यायचा आहे, असं अनिल पंडितने हल्लेखोराला सांगितले होते. मुंबई पोलीस या दाव्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी करत आहेत.

टायगर नेमकं काय म्हणालेला?

'हीरोपंती 2' च्या प्रमोशनदरम्यान टायगरने मिश्किलपणे, "या इंडस्ट्रीमध्ये एकच 'टायगर' आहे आणि तो म्हणजे सलमान सर. त्यांच्यासमोर मी फक्त एखाद्या मांजरासारखा आहे. मी सिम्बा आहे, म्हणजे वाघाचे पिल्लू...", असं म्हटलं होतं. याच विधानामुळे टायगरवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आरोपी कोण आहेत?

पकडलेल्या तीन आरोपींपैकी टायगरवरील हल्ल्याचा त्याच्या विधानाशी संबंध असल्याचा दावा करणारा आरोपी 17 वर्षांचा असून तो हरियाणातील एका कुंभाराचा मुलगा आहे. दुसरा आरोपी 22 वर्षीय हृतिक कुमार ऊर्फ रोशन आहे. रोशन बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराइचा रहिवासी असून 'रॅपिडो' रायडर म्हणून काम करत होता. तिसरा आरोपी 18 वर्षीय रेहान आहे. रेहान हरियाणातील सोनीपत येथील ईदगाह कॉलनी (सदर पोलीस ठाणे हद्द) येथील रहिवासी आहे.

28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

तिन्ही आरोपींना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांनी कोठडीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवून मागितली होती, परंतु न्यायालयाने ती केवळ 28 ऑक्टोबरपर्यंतच मंजूर केली. 18 ऑक्टोबर रोजी, टायगर मुंबईमधील फुटबॉलच्या मैदानावरून बाहेर पडताच तिन्ही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर घडली.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराआधी अनेक अभिनेत्यांच्या घराची रेकी

प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर टायगरचा पाठलाग करत होते. त्याच्या दैनंदिन हालचालींवर ते लक्ष ठेवून होते. टायगरव्यतिरिक्त आरोपींनी अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि इतर अनेक अभिनेत्यांच्या निवासस्थानांचीही रेकी (पाहणी) केली होती. टायगरच्या आधी, रोहित शेट्टी, कपिल शर्मा, एपी धिल्लन, गुरू रंधावा आणि गिप्पी ग्रेवाल यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीने हल्ला केलेला आहे. या सर्वांचा सलमान खानशी संबंध असल्याने आणि त्याने काळवीट मारल्याने बिश्नोई टोळीने सलमानला माफी मागण्याचं आवाहन केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES