• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री

बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री

Ben Stokes In IPL 2027 : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने यंदा आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र त्याचं नाव यादीत आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Reported Bypooja pawar
Published: Nov 24, 2026, 23:05 IST|Updated: Nov 24, 2026, 23:11 IST
joinshare
बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री
Image Credit: बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री

बेन स्टोक्ससाठी बीसीसीआयने बदलला नियम? IPL 2027 च्या ऑक्शनमध्ये मिळाली एंट्री

2

याच्या समोर चिकन लॉलीपॉपही फेल, घरातील साध्या भाज्यांपासून बनणारी ही रेसिपी आजच ट्राय करा

3

'मार्क्स कमी करीन’ म्हणत विद्यार्थिनीवर दबाव? शिक्षक पाठवायचा नको ते मेसेज; व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे प्रकरण उघड

4

प्लॅनिंग करून वैभव सूर्यवंशीने ठोकल्या 204 धावा, सामन्यानंतर केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

5

धक्कादायक! सूरतमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 6 जणांना कालव्यात फेकून दिलं; दोन लहान मुलांचा समावेश

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Ben Stokes In IPL 2027 : आयपीएल 2027 च्या सीजनसाठी 16 डिसेंबर रोजी गोव्यात मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनसाठी खेळाडूंनी आपलं रजिस्ट्रेशन केलं असून 1200 हून अधिक खेळाडूंनी आपली नावं नोंदवलं आहे. मात्र यात सर्वात आश्चर्यचकित करणारं नाव आहे इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर बेन स्टोक्सचं. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने सुद्धा आयपीएल ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 2023 नंतर पहिल्यांदाच बेन स्टोक्स हा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.

क्रिकेबझच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या खुलाश्यानुसार बीसीसीआयने नोंदणीकृत खेळाडूंची एक मोठी यादी जाहीर केली आहे ज्यात 1220 नावांचा समावेश आहे. सर्व 10 फ्रँचायझींसोबत ही यादी शेअर करण्यात आली असून या यादीत भारतसह विविध देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. बेन स्टोक्सचे नाव असणे ही सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट ठरली आहे. त्याने आपली बेस प्राईस २ कोटी रुपये निश्चित केली असून इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याचे नाव या यादीत असणे हे त्याच्या निवृत्तीमुळे नव्हे, तर बीसीसीआयच्या विशिष्ट नियमांमुळे आश्चर्यकारक ठरले आहे.

बीसीसीआयने बदलला नियम :

बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी परदेशी खेळाडूंबाबत एक कठोर नियम केला होता. या नियमात स्पष्ट होतं की विदेशी खेळाडू जे आयपीएलमध्ये आधी खेळलेले आहेत जर त्यांनी  मेगा ऑक्शनसाठी रजिस्टर केलं नाही तर ते पुढील मिनी ऑक्शनमध्ये सामील होऊ शकत नाहीत. इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सने 2025 मेगा ऑक्शनसाठी आपलं नाव रजिस्टर केलं नव्हतं. ज्यामुळे त्याला आयपीएल 2026 आणि 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये स्थान मिळायला नको हवं होतं. मात्र बेन स्टोक्सचं नाव रजिस्टर केलेल्या नावांच्या यादीत आहे. तेव्हा बीसीसीआयने बेन स्टोक्ससाठी आपला नियम बदलला का? याची चर्चा होतेय. या नियमाला एक अपवाद होता की जर एखादा खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून अशा आशयाचे पुष्टीकरण मिळवू शकला ज्यात दुखापत किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे तो सहभागी होऊ शकला नाही, असे नमूद केलेले असेल तर त्याला कदाचित परवानगी दिली जाऊ शकत होती. तेव्हा आता  संदर्भात, स्टोक्सच्या बाबतीत आता हाच सर्वात कुतूहल निर्माण करणारा प्रश्न ठरला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
IPL