SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

2027पर्यंत धोका कायम, कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे अतिवृष्टी, जगभरात हाहाकार उडणार!

एल निनोची परिस्थिती 2027पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. याकाळात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 10, 2026, 13:34 IST | Updated: Nov 10, 2026, 13:35 IST
Image Credit: A strong El Nino could drag the crisis into 2027
Join

एल निनो हे नाव तुम्ही आत्तापर्यंत कित्येकदा ऐकलं असेल. जगात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 2026मध्ये वाढलेले तापमान, वितळणाऱ्या हिमनद्या आणि वाढणारी समुद्राची पातळी ही संकटे एकामागून एक सुरूच आहेत.  सुपर एल निनोमुळं हे संकट 2027पर्यंत राहू शकते. याकाळात उष्णतेच्या लाटा, वादळे आणि अतिवृष्टीची तीव्रता वाढू शकते. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळं जैवविविधता, अर्थव्यवस्था आणि उपजिविकेच्या साधनांचा धोका वाढत आहे.

World Meteorological Organization (WMO)च्या स्टेट ऑफ द क्लायमेट अपडेट 2026 नुसार मागील 12 वर्षे ही आत्तापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्षे ठरली आहेत. त्यातील शेवटची चार वर्षे अत्यंत उष्ण शहरे ठरली. जानेवारी-सप्टेंबर 2026 या कालावधीत जागतिक सरासरी पृष्ठभागाचे तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व सरासरीपेक्षा अंदाजे 1.47 अंशाने जास्त होते. एल निनोमुळं वर्षाच्या अखेरीस यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

2026 मध्ये, समुद्राची पातळी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या मासिक तापमानाचे विक्रम नोंदवले गेले. हिमनद्यांचे वितळणे सुरूच आहे. 2025 मधील बर्फाच्या वार्षिक वस्तुमानाच्या घटीमुळे वर्षातील प्रत्येक सेकंदाला पाच ऑलिम्पिक जलतरण तलाव भरता आले असते. 2014 पासून गोड्या पाण्याचा साठा कमी होत आहे.

सध्याचा एल निनो आरोग्यासाठी अनेक पटींनी धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढती उष्णता, दुष्काळ आणि मुसळधार पावसामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, वणव्याचा धूर आणि हवेची खालावलेली गुणवत्ता, कुपोषण आणि अन्नसुरक्षेचा अभाव, दुखापती, तसेच पाण्याद्वारे आणि कीटकांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे बदलणारे धोके वाढू शकतात.

एल निनो 2027 च्या सुरुवातीपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे साधारणपणे वार्षिक जागतिक सरासरी तापमानात 0.1°C ते 0.2°C ची वाढ होते आणि 2026 मधील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील अंतिम तफावत सरासरीपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES