• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले

नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले

महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरचे अखेर निलंबन झाले आहे. डॉक्टरची विभागीय चौकशी सुरू आहे. यापूर्वीही गैरवर्तनाच्या तक्रारी आल्या आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 25, 2026, 15:35 IST|Updated: Nov 25, 2026, 15:41 IST
joinshare
नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले

नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले

2

नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

3

पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

4

AI चे प्रशिक्षण सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टकडून हाय प्रायोरिटी मेसेज; एका क्षणात संपली 24 वर्षांची कारकीर्द!

5

टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नवी मुंबई क्राईम : नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  उपचारासाठी आलेल्या 42 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या  तुर्भे येथील  श्री रामतनु माता बाल रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.  कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांना महापालिका प्रशासनाने सोमवारी निलंबित केले आहे. एपीएमसी पोलिसांनी यापूर्वीच या डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या अंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

नेमकं काय घडलं?

तुर्भे परिसरात राहणारी 42 वर्षीय महिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तुर्भे येथील श्री रामतनु माता बाल रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावेळी ती तपासणीसाठी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांच्याकडे गेली असता, डॉक्टरांनी तिची तपासणी करण्याऐवजी तिचा हात पकडून पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले आणि शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने रुग्णालयातून बाहेर पडून एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

11 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी एका 11 महिन्यांच्या चिमुकली मुलीसोबत लैंगिक शोषणाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नातेवाईकाला अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुरडीवर 48 वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

चिमुकलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी दीपक रवींद्र श्रीखंडे असे नाव असलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. चिमुकली तिच्या घराशेजारी खेळत असताना, जवळच राहणाऱ्या आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेले. त्याने त्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिला तिच्या घराच्या अंगणात सोडून दिले. पुढे एका शेजाऱ्याच्या चिमुकलीच्या पायांवर रक्त असल्याचे लक्षात आले.

यानंतर नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात तिला दाखवल्या असता हा प्रकार उघडकीस झाला यानंतर कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. अधिकृत वैद्यकीय रिपोर्ट समोर यायचा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Navi Mumbai