• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या 4 नंबर गेटजवळ एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ज्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तो कोण होता आणि त्याच्यावर हल्ला का करण्यात आला यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 15:16 IST|Updated: Nov 25, 2026, 15:39 IST
joinshare
पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर
Image Credit: pune firing attack

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

2

पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

3

AI चे प्रशिक्षण सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टकडून हाय प्रायोरिटी मेसेज; एका क्षणात संपली 24 वर्षांची कारकीर्द!

4

टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

5

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आज भरदिवसा पुण्यामध्ये गँगवारचा थरार पाहिला मिळाला. पुण्यातील सर्वात वर्दळ असलेल्या शिवाजीनगर कोर्टात एका व्यक्तीवर पाच ते सहा जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. पाच ते सहा जणांनी त्या व्यक्तीवर दोन राऊंड गोळीबार केला. त्या गोळीबारात तो व्यक्ती थोडक्यात बचावला म्हणून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ज्यात त्या व्यक्तीचा एक हात तुटला. पुण्यात भरगर्दीत रक्तरंजित थरार परिसरातील अनेक लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहिला. या थरारक हल्लेचा व्हिडीओ समोर आला आहे. तर हल्ला झालेला व्यक्ती कोण होता, त्यावर हा हल्ला का झाला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तो मंदार किवळे कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंदार मारुती किवळे असं आहे.  20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर इथल्या जमिनीच्या/आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात मंदार मारुती किवळे हा आरोपी होती. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वी तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

हेसुद्धा वाचा -  पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला गँगवॉरमधून झाला आहे. कारण मंदार मारुती किवळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शुभम या तरुणाची 20 एप्रिल 2025 ला चौघांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. शुभमच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अमर दिलीप साकोरे (वय 40) याच्यासह मंदार मारुती किवळे (वय 35), गिरीश सुभाष बाबरे (वय 25) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय 35) ला अटक करण्यात आली होती.

कशी झाली होती शुभमची हत्या?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. 20 एप्रिल 2025 ला शुभम पहाटे कात्रजमधील संतोषनगर परिसरात होता. त्यावेळी अमर, मंदारसह अन्य दोघांनी शुभमला रस्त्यात अडवलं आणि त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यातून शुभमने आपली सुटका करत पळ काढला. पण हल्लेखोऱ्याने त्याचा पाठलाग करत परत पकडलं आणि बांबूने मारहाण केली. त्यात शुभमच्या डोक्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला.

हल्लेखोरांनी तरुणावर हल्ला केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मंदार हा कोर्टाच्या आवारात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. या हल्ल्यात मंदाराचा एक हात कोयत्याने छाटण्यात आला. हल्लेखोराने मंदारवर कोयत्याने सपासप वारे केले. मंदारच्या डोक्यावरही गंभीर दुखापत झाली आहे. अर्धमेल्या अस्वस्थेत तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला परिसरातील पोलिसांनी रुग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime