• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

पुण्यात भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार झाला आहे. यात एक जण जखमी झाला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 13:33 IST|Updated: Nov 25, 2026, 15:34 IST
joinshare
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार,  5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?
Image Credit: pune gunshots were fired

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

2

पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

3

AI चे प्रशिक्षण सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टकडून हाय प्रायोरिटी मेसेज; एका क्षणात संपली 24 वर्षांची कारकीर्द!

4

टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

5

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार करण्यात आला.  मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 6 जणांच्या टोळीने एका व्यक्तीवर कोर्टाबाहेर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तीचं नाव मंदार मारूती किवळे असं असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जोडलेला आहे. मंदार मारूती किवळे तो कात्रज हत्या प्रकरणातील आरोपी होता. चारच दिवसांपूर्वी तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. आज कोर्टात काही कामकाजासाठी तो शिवाजीनगर कोर्टात आले असताना त्याच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. 

पोलिसांनी सांगितलं की, शिवाजीनगर कोर्टात झालेल्या मंदारवरील हल्ला हा शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर पोलिसांना हल्लेखोऱ्यांची ओळख पटली असून त्यांना पकडण्यासाठी १० पोलिसांचं पथक शोध मोहीमेवर निघाले आहेत. 

दरम्यान शिवाजी नगर कोर्टात सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं आहे. ज्यामध्ये दुचाकीवरून 5 ते 6 जण शिवाजीनगर कोर्टात आले. त्यांनी मंदारवर दोन राऊंड गोळीबार केला, ज्यात तो वाचला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. ज्यात मंदारचा मृत्यू झाला आहे. दोन दुचाकीवरून  5 ते 6 जण बंदुक आणि कोयता घेऊन आले होते. दोन जणांकडे गावठी पिस्तुल होती आणि 5 ते 6 जणांकडे कोयता होता. कोर्टाचे कामकाज सुरु असल्याने कोर्टात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसंच शिवाजीनगर कोर्टाच्या अगदी जवळ मेट्रो स्टेशन असल्याने परिसरात भीतीदायक वातावरण आहे. 

कोर्टात उपस्थितीत असलेले प्रत्यक्षदर्शी वकील यांनी या घटनेची माहिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शी वकील म्हणाले की, ही घटना साधारण दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे. आम्ही कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावरील कोर्टात होतो. तेव्हा अचानक आम्हाला गोळीबाराचा आवाज आला. तर आम्ही खिडकीतून खाली पाहिलं तर  5 ते 6 जणांचा एक गट दोन व्यक्तींच्या मागे धावतो.या गटाकडे दोन पिस्तुल आणि इतरांकडे कोयता होता. त्यांनी दोन वेळा दोन राऊंड गोळीबार केला. तर त्यांनी संबंधित व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ज्यात एका व्यक्तीचा हात कापला गेला. याच गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. 

दरम्यान प्रथमदर्शीनी हा गोळीबार दोन गटातील गँगवार असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की,  एका गाडीवरती तिघे तर दुसऱ्या गाडीवरती चौघे जण कोर्टात आले होते. घटनास्थळावर मोठी गर्दी होती. पण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही.

दरम्यान फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आजूबाजूच्या परिसर तपासला जातोय. पोलिसांनी शंका आहे की, मृत्यू व्यक्ती ज्यावर हल्ला झाला तो जामिनीवर सुटलेला असावा. 

विजय वडेट्टीवार यांनी पुणे गोळीबार प्रकरणात सोशल मीडियावर पोस्ट लिहित सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 

न्यायालयाच्या दारातच गोळीबार, महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे!*

पुण्यात गुंडगिरीने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पुण्यात कोयता गँगची दहशत असतानाच आता थेट न्यायालयाच्या दारात गोळीबार आणि कोयत्याने हल्ले होत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हेच या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

कधी गुन्हेगार हॉस्पिटलमधून पळून जातात, कधी त्यांच्या दहशतीच्या रील्स व्हायरल होतात, तर आता थेट न्यायालयाच्या परिसरात गोळीबार केला जातो. ज्या ठिकाणी न्याय मिळण्याची अपेक्षा असते, त्याच न्यायालयाच्या दारात कायद्याचे धिंडवडे निघत आहेत.

VijayWadettiwar

गृहमंत्र्यांच्या भाषणांत कायदा-सुव्यवस्थेचे गोडवे आणि आकडेवारी चांगली दिसते पण प्रत्यक्ष जमिनीवर कायदा-सुव्यवस्था काय आहे हे आज स्पष्ट झाले!
प्रत्येक घटनेनंतर चौकशीचे आदेश आणि कारवाईची आश्वासने देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही. या घटनेची जबाबदारी कोण घेणार? पोलीस यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे!

pune gunshots

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime
Breaking News