भीषण अपघात! दोन हायस्पीड ट्रेनची समोरासमोर धडक, 46 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
देशातील रेल्वे सिस्टीम ऑपरेट करणाऱ्या 'एडीआयएफ' (ADIF) या संस्थेने हा अपघात टोलेडो (Toledo) प्रांतात, माद्रिद ते सेव्हिल (Madrid to Seville) मार्गावर झाला असल्याची माहिती दिली आहे.
स्पेनमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे माद्रिदजवळ झालेल्या रेल्वे अपघातात किमान 46जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर माद्रिद, स्युदाद रियाल आणि आंदालुसिया (Madrid, Ciudad Real and Andalusia ) दरम्यानची रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. देशातील रेल्वे प्रणालीचे संचालक 'एडीआयएफ' (ADIF) ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात टोलेडो प्रांतात स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता घडला.
'एडीआयएफ'ने 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे की, "दोन गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यामुळे माद्रिद-आंदालुसिया हाय-स्पीड रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे."
माद्रिद-आंदालुसिया हाय-स्पीड रेल्वे मार्गावर, दक्षिणेकडे जाणारी सरकारी मालकीची 'रेनफे एव्हीई' (Renfe AVE) ट्रेन, तिथे आधीच थांबलेल्या 'इर्यो' (Iryo) ट्रेनवर मागून आदळली. या धडकेमुळे रेल्वेचे डबे घसरून खाली कोसळले. प्रशासनाने प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा दिला असला तरी हा आकडा वाढू शकतो. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पादिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रेनफे' ट्रेनमध्ये 397 प्रवासी होते, तर 'इर्यो' ट्रेनमध्ये 147 प्रवासी प्रवास करत होते.
स्पेनच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया
स्पेनच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर या वर्षात झालेली हा दुसरा अपघात पाहून आपल्याला धक्का बसला आहे, असे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी बुधवारी सांगितले.
"टोलेडो येथे झालेल्या गंभीर रेल्वे अपघातामुळे मला धक्का बसला आहे. मी परिवहन मंत्री आणि कॅस्टिला-ला मांचाचे अध्यक्ष यांच्याशी सतत संपर्कात आहे. आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी कार्यरत असून, संबंधित प्रशासनांच्या समन्वयाने पीडितांना मदत करत आहेत आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहेत. सर्व पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, त्यांना माझ्या संवेदना आणि पूर्ण पाठिंबा आहे," असे त्यांनी 'एक्स' वर लिहिले.