मोठी दुर्घटना! आकाशात 2 विमानांची एकमेकांना धडक; 4 पायलट ठार
फिलिपिन्स मोठी दुर्घटना घडली आहे. दोन विमानांची धडक झाली.यात 4 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
फिलिपिन्स : फिलिपिन्स मध्ये एक मोठी विमान दुग्ठना घडली आहे. हवाई दलाची दोन विमाने कोसळून चार वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. आकाशातच 2 विमानांची एकमेकांना धडक झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघतानंतर हवाई दलाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे नमूक करण्यात आले आहे. सरावादरम्यान हा अपघाच घडल्याचे समजते.
23 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी अंदाजे 3:51 वाजता ही विमान दुर्घटना घडली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिलाच्या दक्षिणेला बटांगस प्रांतातील लिपा शहरात हा विमान अपघात घडला आहे. दोन विमानांची धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. फर्नांडो हवाई तळावरून या दोन्ही विमानांनी उड्डाण केले. एसएफ-260 या प्रशिक्षण विमानांनी उड्डाण केले. ही दोन्ही विमाने सराव करत होती. फिलिपिन्स हवाई दलाची ही दोन दोन्ही विमाने उड्डाण प्रशिक्षण घेत असताना आकाशातच एकमेकांना धडकली.
विमानांची एकमेकांना धडक झाल्याने दोन्ही विमाने अनियंत्रितपणे खाली कोसळू लागली. सुदैवाने, दोन्ही विमाने फर्नांडो हवाई तळाच्या हद्दीतच कोसळली. त्यामुळे तळाबाहेरील कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान टळले. मात्र, या भीषण अपघातात विमानात असलेले चारही फिलिपिनो वैमानिक जागीच ठार झाले.
विमानतळावर खळबळ
या भीषण दुर्घटनेनंतर फर्नांडो हवाई तळावर एकच खळबळ उडाली. आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. फिलिपिन्स हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल अल्विन जे. कॅपिंगुयन यांनी एक निवेदन जारी करून अपघाताची अधिकृतपणे पुष्टी केली. त्यानी या दुर्घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे. सर्व आवश्यक मदत आणि सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्या चार वैमानिकांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि आधार दिला जाणार. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास पथक या अपघातामागचे मुख्य कारण शोधत असल्याची माहिती वायुसेना प्रशासनाने दिली.
एसएफ-260 विमानांच्या उड्डाणावर बंदी
यापूर्वी देखील एसएफ-260 विमानांचे अनेक अपघात झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हवाई दलाने एसएफ-260 विमानांचे उड्डाण थांबवले. एसएफ-260 विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली.