SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एलियनच्या अस्तित्वाबाबतचा सर्वात मोठा पुरावा? महासागराच्या तळाशी सापडले 12,000 रहस्यमयी व्हायरस, शास्त्रज्ञ थक्क

महासागरच्या तळाशी 12,000 रहस्यमयी व्हायरस सापडले आहेत. यांची जनुकीय रचना पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. यांचा संबध एलियन सोबत जोडला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 19, 2026, 11:00 PM IST | Updated: Oct 19, 2026, 11:12 PM IST
Join

Mysterious Viruses Found undersea: परग्रहवासी अर्थात एलियनच्या अस्तिवाबाबत अनेक तर्क मांडले जातात. दावे केले जातात. अशातच एलियनच्या अस्तित्वाबाबतचा सर्वात मोठा पुरावा सापडल्याचा दावा केला जात आहे. अवकाशात किंवा परग्रहावर नाही तर, पृथ्वीवरच समुद्राच्या तळाशी संशोधकांना हे पुरावे सापडले आहेत.  महासागरच्या तळाशी  12,000 रहस्यमयी व्हायरस सापडले आहेत.  त्यांपैकी 99 टक्क्यांहून अधिक विषाणूंची ओळख शास्त्रज्ञांना अजूनही पटलेली नाही. हे विषाणू पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत. 

चीनमधील चोंगकिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी जगाला अचंबित केले आहे.  पॅसिफिक महासागरातील क्लॅरियन-क्लिपरटन झोनमध्ये रहस्यमयी विषाणू सापडले आहेत. 11,662 नवीन विषाणूंचा वेगळा गट ओळखण्यात आला आहे.  मेक्सिको आणि हवाईच्या दरम्यानच्या विशाल सागरी प्रदेशात हे संशोधन करण्यात आले. महासागराच्या अंदाजे 6,000 मीटर खोलीवर संशोधकांना हे रहस्यमयी व्हायरस आढळून आले आहेत. 

समुद्राच्या तळाशी जेथे हे व्हायरस सापडले आहेत तेथे सूर्यप्रकाश देखील पोहचत नाही. खोल समुद्रात या गूढ अंधाऱ्या जगात जीवसृष्टी कशी टिकून आहे अशा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे.

समुद्राखाली दडलाय अमूल्य धातूंचा खजिना

जिथे हे 12,000 रहस्यमयी विषाणू सापडले आहेत तेथे अमूल्य धातूंचा खजिना देखील दडलेला आहे.  या प्रदेशाचा तळ लाखो धातूंनी समृद्ध असलेल्या खडकांनी भरलेला आहे. याला पॉलिमेटॅलिक नोड्यूल्स म्हणतात. येथे कोबाल्ट, निकेल आणि मँगनीजसारखे धातू आढळतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मीतीसाठी या धातूंचा वापर केला जातो. यामुळेच या समुद्रतळाच्या खाणकामात जागतिक स्वारस्य वाढत आहे. मात्र,  या खडकांच्या सभोवताली एक सूक्ष्म जग देखील अस्तित्वात आहे. ज्याचा बराचसा भाग अजूनही अज्ञात आहे.

विषाणूंचा संबध एलियन्सशी का जोडला जात आहे?

शास्त्रज्ञांनी समुद्राच्या तळावरून 60 हून अधिक नमुने गोळा केले आहेत. याच्या विश्लेषणातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. या विषाणूंची जनुकीय रचना पूर्वी उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक माहितीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी आहे. त्यांच्या प्रथिन गटांपैकी केवळ 4 टक्के गट जागतिक डेटाबेसमधील माहितीशी जुळले. हे असे अनेक विषाणू आहेत जे शास्त्रज्ञांसाठी अज्ञात आहेत. यामुळेच या विषाणूंचा संबध एलियन्सशी जोडला जात आहे. 

खनिजांच्या शोधासाठी  समुद्रतळाशी प्रचंड प्रमाणात खाणकाम केले जात आहे. यामुळे समुद्रतळ विस्थापित होऊ शकतो, ज्यामुळे सूक्ष्मजीव आणि त्यांच्याशी संबंधित नैसर्गिक चक्रांवर संभाव्यतः परिणाम होऊ शकतो अशी चिंता शास्त्रज्ञी व्यक्त केली आहे.

सध्या या विषाणूंचा  मानवी आरोग्यासाठी कोणाताही धोका नाही. मात्र, सागरी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. ते सूक्ष्मजीवांच्या लोकसंख्येचे नियमन करण्यास आणि कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस व सल्फर यांचे नैसर्गिक चक्र टिकवून ठेवण्यास मदत करतात. काही विषाणूंमध्ये अशी जनुके देखील असतात, जी सूक्ष्मजीवांना प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्यास मदत करू शकतात.  या शोधामुळे समुद्राखाली दडलेल्या अनेक रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES