• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये फोनवरच बाचाबाची, मोठमोठ्यानं एकमेकांवर ओरडले? इस्रायलमधील सत्तांतरणाआधीच वाद कशावरुन झाला?

ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये फोनवरच बाचाबाची, मोठमोठ्यानं एकमेकांवर ओरडले? इस्रायलमधील सत्तांतरणाआधीच वाद कशावरुन झाला?

बेंजामिन नेतन्याहू निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही लगेच पायउतार झालेले नाहीत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहतील, मात्र राष्ट्रपती इसाक हर्झोग यांनी विरोधी पक्षनेते गादी आयजनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे नेतन्याहू यांच्याकडे पंतप्रधान म्हणून फार कमी दिवस शिल्लक आहेत.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 06:32 IST|Updated: Nov 13, 2026, 06:59 IST
joinshare
ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये फोनवरच बाचाबाची, मोठमोठ्यानं एकमेकांवर ओरडले? इस्रायलमधील सत्तांतरणाआधीच वाद कशावरुन झाला?
Image Credit: इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडूनही आली प्रतिक्रिया (प्रातिनिधिक फोटो सौजन्य वृत्तसंस्थांकडून सभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

2

सामना ड्रॅा झाल्यानंतर आर अश्विन शुभमन गिलवर संतापला! म्हणाला 'एक तास आधीच हार का मानली...?'

3

'पार्ट्या, सिगारेट, मद्यपान, स्त्रियांच्या मागे...', युवराज सिंगच्या वडिलांना पृथ्वी शॉचा थेट इशारा; Insta स्टोरीने क्रिकेट विश्वात खळबळ

4

पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

5

'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवर बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान म्हणून शेवटचे काही दिवस पदावर असतानाच नेतन्याहू आणि ट्रम्प यांचं फोन कॉलदरम्यान इराण युद्धावर चांगलच वाजल्याचं सांगितलं जात आहे. नेतन्याहू यांनी इराणवर अमेरिकेने पुन्हा जोरदार हल्ले सुरु करावेत अशी भूमिका मांडली. मात्र ट्रम्प यांनी त्याला विरोधक करत चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यास प्रधान्य दिलं जाईल असं सांगितलं. या मतभेदावरुनच दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं सांगितलं जात आहे. 

एवढी आरडाओरड सुरु होती की...

इस्रायलमधील 'वायनेट' आणि 'येदिओथ अहरोनोथ' या वृत्तपत्रांमधील बातम्यांनुसार, नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर इराणविरुद्धचं युद्ध पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव टाकला, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी राजनैतिक मुदसद्देगिरी आणि चर्चेच्या माध्यमातून हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या आणि तेहरानसोबतच्या वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या बाजूने मत दिले. सदर संभाषणासंदर्भात अंतर्गत माहिती असलेल्या सूत्रांनी या दोन्ही नेत्यांमधील हा कॉल असामान्य तणावपूर्ण संवादाचा राहिल्याचं म्हटलं आहे. संबंधित एका अधिकाऱ्याने तर दोन्ही बाजूने एवढी आरडाओरड सुरु होती की या कॉलला  'नरकातील आरडाओरडा' असे म्हटले आहे. 

नेतन्याहू यांचा ट्रम्प यांना रोज फोन?

'फायनान्शियल टाईम्स'च्या वृत्तानुसार, नेतन्याहू हे इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्यासाठी ट्रम्प यांना दररोज फोन करत आहेत. इराणमधील विद्यमान राजवट नष्ट करणे आणि त्यांचा अणुकार्यक्रम रोखणे हा नेतन्याहू यांचा उद्देश असल्याचं या वृत्तात म्हटलं असून पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी नेतन्याहू यांना काहीही करुन इराणला धडा शिकवायचा असल्याचा दावा केला जातोय. मात्र यासाठी त्यांना अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी राजी करावं लागणार आहे. त्यांचे हेच प्रयत्न सुरु आहेत. 

ट्रम्प यांची संयमी भूमिका, चर्चेला प्राधान्य

मात्र दुसरीकडे मीड टर्म इलेक्शनमध्ये इराण युद्धाचा मोठा फटका बसल्याने ट्रम्प ताकही फुंकून पिताना दिसत आहेत. ट्रम्प सध्या इराणसोबतचे युद्ध वाढवण्यास किंवा मोठ्या लष्करी कारवाईस तयार नाहीत. 8 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात त्यांनी सध्या इराणविरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची गरज नसल्याचे संकेत दिले होते. 12 नोव्हेंबरच्या 'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा पुढे नेण्याची जबाबदारी आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्यावर सोपवली आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक चिघळू नये यासाठी वॉशिंग्टनचे अधिकारी आणि प्रादेशिक नेते प्रयत्न करत असल्याचं या इस्रायली वृत्तपत्राने म्हटलं आहे. इस्रायलमध्ये सत्तापालट झाला असून त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. 

या वादावर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाचं म्हणणं काय?

दुसरीकडे, फोन कॉलवर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी आणि आरडाओरड झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने हे वृत्त फेटाळले असून असा कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये असा कोणताही वाद झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाचे म्हणणे आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Donald Trump
Benjamin Netanyahu