SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'डायरेक्ट हिट', सौदी अरेबियाच्या मंत्रालयावर बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला; हुथी बंडखोराचा दावा

सौदीने आपण हुथी बंडखोरांकडून डागलेली दोन क्षेपणास्त्रे रोखून पाडल्याचा दावा केल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 27, 2026, 08:25 PM IST | Updated: Oct 27, 2026, 08:38 PM IST
Image Credit: सौदी अरेबियाच्या मंत्रालयावर बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला (Photo - Reuters)
Join

सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य केल्याचा दावा येमेनमधील हुथी बंडखोरांनी केला आहे. राजधानी रियाधमध्ये करण्यात आलेल्या या बॅलिस्टिक मिसाईलने अचूक लक्ष्य गाठल्याचाही दावा त्यांनी केला आहे. हुथी गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी (Houthi military spokesman Yahya Saree) यांनी सांगितले की, "आमच्या सशस्त्र दलांनी शत्रू देश सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील संरक्षण मंत्रालयाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य केले आणि हा हल्ला थेट होता."

याआधी, हुथी बंडखोरांनी डागलेली दोन क्षेपणास्त्रे आपण रोखल्याचे सौदी अरेबियाने जाहीर केले होते. वृत्तसंस्था एएफपी (AFP) ने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या राजधानीत काही वेळापूर्वी स्फोटांचे आवाज ऐकू आले होते.

 हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही (Ras Tanura) हल्ला केल्याचा दावा केला आहे. हा प्रकल्प होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला, आखाती किनारपट्टीवर स्थित आहे. हुथी प्रवक्ते सारी यांनी सांगितले की, त्यांनी या शुद्धीकरण प्रकल्पावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले, ज्यामुळे तिथे आगीचा भडका उडाला. मात्र, सौदी प्रशासनाने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही.

तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या दक्षिणेस असलेल्या 'अल खोबार' शहरातील एका रहिवाशाने एएफपी (AFP) वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि त्यांच्या फोनवर एक सतर्कतेचा अलर्ट आला. समुद्री सुरक्षा संस्था 'व्हॅनगार्ड'नेही मंगळवारी Ras Tanura मध्ये आग लागल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, परंतु "नुकसानीची व्याप्ती आणि तेल भरण्याच्या प्रक्रियेवर झालेला परिणाम" अद्याप स्पष्ट झालेला नाही. सौदी अरेबिया आणि येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोर यांच्यातील संघर्ष सप्टेंबर महिन्यापासून अधिक तीव्र झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES