SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जॉर्डनमधील ऐतिहासिक चर्चमध्ये अंत्यविधी सुरू असताना गोळीबार, कारमधून आले अन्...7 जणांचा मृत्यू, तर 40 जण जखमी

जॉर्डनच्या ऐतिहासिक चर्चमध्ये अंत्यविधी सुरू असताना अचानक तीन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 24, 2026, 07:56 AM IST | Updated: Oct 24, 2026, 08:00 AM IST
Image Credit: jordan karak church firing
Join

जॉर्डनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जॉर्डनमधील ऐतिहासिक चर्चमध्ये अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांवर तीन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या भयानक आणि अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये  7 जणांचा नाहक बळी गेला आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही रक्तरंजित घटना राजधानी अम्मानपासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर असलेल्या हमूद शहरातील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये घडल्याचे वृत्त आहे. चर्चेमध्ये शांतपणे प्रार्थना सुरु असताना अचानक एक कार आली. त्यातून तीन लोक उतरली आणि एके-47 ने चर्चाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करु लागली. अचानक झालेल्या या गोळीबारमुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेनंतर जॉर्डनच्या सुरक्षा दलाने हा परिसर सील केला आहे. तर हल्लेखोरांचा शोध घेण्यात आहे.

चर्चेमध्ये गोळीबाराचा आणि किंकाळ्यांचा आवाज

गोळीबाराच्या दरम्यान शांत असलेल्या चर्चेमध्ये गोळीबाराचा आणि किंकाळ्यांचा आवाज घुमत होता. या थरारक घटनेनंतर चर्चेमध्ये पसरलेले चप्पल - बूटांचा थर, सर्वत्र रक्तच रक्त, पाहून सुरक्षा दलही हादरले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतं.

जॉर्डनच्या जनतेमध्ये फूट पाडू शकतात असा भ्रम...

जॉर्डन सरकारचे प्रवक्ते मोहम्मद अल-मोमानी यांनी घटनेनंतर लगेचच एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे. मोमानी यांनी या निवेदनात म्हटलंय की, "सुरक्षा यंत्रणा करकमधील या हिंसक गोळीबाराच्या घटनेची सखोल चौकशी सुरु झाली आहे. तर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हल्ल्यामागे असलेल्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा दिली जाईल असं म्हटल आहे. ते पुढे म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल. जे लोक आपल्या गोळ्यांनी जॉर्डनच्या जनतेमध्ये फूट पाडू शकतात असा भ्रम बाळगतात, ते आमच्या एकतेपुढे टिकू शकणार नाहीत, असंही त्यांनी इशारा दिला आहे.

 

 

चर्चमधील थरारक घटनेचा व्हिडीओ समोर


दरम्यान या हल्ल्याची थेट जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी किंवा बंडखोर गटाने घेतलेली नाही. शिवाय या हल्ल्यामागील कारणही अद्याप समोर आलेले नाहीय.  दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चर्चच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा हल्ला कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तीन जण चर्चवर गोळीबार करताना दिसून येत आहे.

दरम्यान पश्चिम आशियातील अशांत वातावरणातही जॉर्डनला दीर्घकाळापासून एक सुरक्षित आणि शांत शहर मानलं जातं होतं. त्यामुळे तिथे चर्चवर अशा प्रकराच्या थरारक घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES