मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धा केवळ तिच्या सुंदर पोशाख आणि ग्लॅमरस शैलीमुळेच नव्हे, तर एका वादग्रस्त ड्रेसमुळेही चर्चेत आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आहे या व्हिडिओमुळे नवा वाद आता उकळला आहे. मिस इस्रायल डॅनिएल याब्लोन्का 'शांती'चा संदेश घेऊन तिच्या राष्ट्रीय पोशाखात आली, परंतु तिच्या शैलीमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. या ड्रेसवर जेरुसलेमचे जुने शहर, जैतुनाची झाडे आणि प्रसिद्ध जाफा संत्री यांचे चित्रण होते. 'शांती' (Peace) हा शब्द हिब्रू, अरबी आणि इंग्रजीमध्येही लिहिलेला होता. नक्की झाले काय यासंदर्भात या वादाचे स्पष्टीकरण आणि हा वाद नक्की का निर्माण झाला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
मिस इस्रायल डॅनिएल याब्लोन्का हिच्या या पोशाखामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले. काहींनी त्याचा संबंध पॅलेस्टिनी वारसा आणि ऐतिहासिक चिन्हांशी जोडला, तर इतरांनी गाझामधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या शांततेच्या संदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॅनियलचा ड्रेस लवकरच मिस युनिव्हर्स 2026 साठी सर्वाधिक चर्चेच्या विषयांपैकी एक बनला. मिस युनिव्हर्स 2026 चा महाअंतिम सोहळा 24 नोव्हेंबर रोजी सॅन जुआन, पोर्तो रिको येथे होणार आहे. स्पर्धेच्या 75 व्या पर्वात, जगभरातील 116 सौंदर्यवती मिस युनिव्हर्सच्या मुकुटासाठी स्पर्धा करतील.
हे ही वाचा
मिस इस्रायल डॅनिएल याब्लोन्का ही जेव्हा रॅम्पवरून चालत होती त्यावेळी एका गटाने तिच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात केली. इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिच्या पोशाखातून दिल्या जाणाऱ्या 'शांतीच्या' संदेशावरही सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल डॅनिएल याब्लोन्का हीने स्पष्टीकरण दिले आहे यावेळी ती म्हणाली की, "ही एक विचित्र गोष्ट आहे, पण मला ९९ टक्के खात्री आहे की घुबडाचे आवाज व्हिडिओमध्ये नंतर टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात कोणीही असे घुबडाचे आवाज ऐकले नाही."
Miss Israel BOOED during Miss Universe 2026 national costume presentation https://t.co/RBMpE5KpDl
— RTVisual (@RT_Visual_on_X) November 22, 2026
डॅनियलने लिहिले की, ती एक इस्रायली महिला आहे आणि शांततेवर तिचा दृढ विश्वास आहे. तिचा विश्वास आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील लोकांना सन्मान, सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि चांगल्या भविष्याच्या आशेने जगण्याचा हक्क आहे. तिने हे देखील स्पष्ट केले की, तिचा पोशाख तिच्या वारशाचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आला होता, इतर कोणत्याही समुदायाचा इतिहास, ओळख किंवा भूमीशी असलेले नाते पुसून टाकण्यासाठी नाही.