• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /देशातील प्रसिद्ध बँक विकण्याची तयारी सुरु असतानाच झाला मोठा खेळ, उफाळला नवा वाद; काय घडलं नेमकं?

देशातील प्रसिद्ध बँक विकण्याची तयारी सुरु असतानाच झाला मोठा खेळ, उफाळला नवा वाद; काय घडलं नेमकं?

आयडीबीआय बँकेच्या विक्रीपूर्वी एक मोठी हालचाल घडली. बँकेच्या दोन मालमत्तांचे मूल्य अचानक 2122 कोटी रुपयांनी कसे कमी झाले? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावरुन 'फेअरफॅक्स' करारावर प्रश्न उपस्थित झाले.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 24, 2026, 14:12 IST|Updated: Nov 24, 2026, 14:26 IST
joinshare
देशातील प्रसिद्ध बँक विकण्याची तयारी सुरु असतानाच झाला मोठा खेळ, उफाळला नवा वाद; काय घडलं नेमकं?
Image Credit: आयडीबीआय बँक

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
गोरं होणं जीव घेणं! मित्राच्या सल्ल्याने फेअरनेस क्रीम वापरली अन् पायावर सूज..., किडनीवरही गंभीर परिणाम, प्रसिद्ध गायकाच्या दावा

गोरं होणं जीव घेणं! मित्राच्या सल्ल्याने फेअरनेस क्रीम वापरली अन् पायावर सूज..., किडनीवरही गंभीर परिणाम, प्रसिद्ध गायकाच्या दावा

2

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! 7 वर्षांपूर्वी युती मोडलेल्या पक्षाशी भाजपाची हातमिळवणी; 2027 ची निवडणूक एकत्र लढणार

3

देशातील प्रसिद्ध बँक विकण्याची तयारी सुरु असतानाच झाला मोठा खेळ, उफाळला नवा वाद; काय घडलं नेमकं?

4

मिस युनिव्हर्स 2026 'Peace' कॉस्ट्यूममुळे नवा वाद! प्रेक्षकांनी केली विरोधात घोषणाबाजी? पहा Video

5

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या नावाची घोषणा; जाणून घ्या त्यांचा साहित्यिक प्रवास

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. अलीकडेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅनडास्थित 'फेअरफॅक्स ग्रुप'ला 81 रुपये प्रति शेअर या दराने बँकेचे शेअर्स विकण्यास मंजुरी दिली होती. मात्र, एका मीडिया रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, बँकेच्या दोन मालमत्तांच्या मूल्यांकनात अचानक 2122 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.

काय घडलंय नेमकं?

आयडीबीआय बँकेच्या विक्रीवरून एक नवा वाद उफाळून आला आहे. ऑक्टोबर महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅनडातील 'फेअरफॅक्स' या कंपनीला 81 रुपये प्रति शेअर दराने बँकेचे शेअर्स विकण्यास मान्यता दिली होती. परंतु, आता समोर आलेल्या एका मीडिया रिपोर्टमुळे या संपूर्ण व्यवहारातील पारदर्शकता आणि मालमत्तांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा मुद्दा बँकेच्या दोन महत्त्वाच्या मालमत्तांच्या मूल्यामध्ये अचानक केलेल्या 2122 कोटी रुपयांच्या कपातीशी संबंधित आहे. आयडीबीआय बँकेच्या विक्रीची प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी, सरकारने बँकेच्या दोन स्थावर मालमत्तांचे मूल्य 2122 कोटी रुपयांनी कमी केले होते. 'बिझनेस वर्ल्ड'च्या पत्रकार पलक शहा यांनी आपल्या अहवालात याबद्दल माहिती दिली.

 दोन मालमत्तांची ओळख नाही

आयडीबीआय बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 च्या वार्षिक अहवालातील नोट्समध्ये अत्यंत संक्षिप्त स्वरूपात या कपातीचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, या टीपेमध्ये संबंधित दोन मालमत्तांची ओळख दिलेली नाही किंवा त्यांच्या मूल्यांकनात इतकी मोठी घट करण्यामागची कारणेही स्पष्ट केलेली नाहीत, असे अहवालात नमूद केले आहे. तसेच आयडीबीआय बँकेच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेदरम्यान समोर आलेली ही पाचवी अशी घटना आहे, ज्यासाठी अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सातत्याने असा दावा केला आहे की, त्यांनी सर्व लागू नियमांचे पालन केल्याचेही अहवालात म्हटलंय.

 

बँकेच्या वार्षिक अहवालात काय म्हटलंय?

अहवालातील माहितीनुसार,  काही कायदेशीर घडामोडींमुळे बँकेच्या दोन स्थावर मालमत्तांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे त्यांची विक्री करण्याच्या क्षमतेवर मर्यादा आली असे आयडीबीआय बँकेच्या आर्थिक विवरणपत्रांच्या टीपांमध्ये नमूद केले आहे. असे असले तरी, या दोन्ही मालमत्ता अजूनही बँकेच्या ताब्यात आणि मालकीच्या आहेत. त्यानंतर, बँकेने या मालमत्तांचे मूल्य निश्चित करण्यासाठी स्वतंत्र वॅल्यूअर्सची नियुक्ती केली. याचा अर्थ असा की, जरी बँक या मालमत्तांची मालकी राखून ठेवत असेल आणि त्यांचा वापर करत असेल, तरीही ती त्यांना खुल्या बाजारात स्वतंत्रपणे विकू शकत नाही. परिणामी, बँकेने आपल्या हिशोबाच्या पुस्तकात (books) या मालमत्तांचे मूल्य 2122 कोटी रुपयांनी कमी केले आहे. यात कोणतीही प्रत्यक्ष रोख रक्कम बाहेर गेलेली नाही—हा बदल केवळ हिशोबाच्या पुस्तकात केलेली नोंद (book-entry reduction) आहे. पण बँकेने या प्रक्रियेत नेमकी कोणती मालमत्ता समाविष्ट आहे, कोणत्या कायदेशीर अडचणी आल्या आहेत, मूल्यमापन कोणी केले किंवा कपातीपूर्वी या मालमत्तांचे मूल्य किती होते, याचा कोणताही खुलासा केलेला नाही.

मूल्य वाढले, मग पुन्हा कमी झाले

विशेष बाब म्हणजे, मालमत्तांच्या मूल्यामध्ये केलेली ही घट, त्यांचे मूल्य वाढवल्याच्या अवघ्या एका वर्षानंतर घडली आहे. अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये एका स्वतंत्र मूल्यमापनकर्त्याने बाजारभावाच्या आधारे आयडीबीआय बँकेच्या मालमत्तांचे मूल्यमापन केले होते. त्यावेळी त्यांचे प्रत्यक्ष मूल्य, बँकेच्या पुस्तकात नोंदवलेल्या मूल्यापेक्षा 2855 कोटी रुपयांनी अधिक असल्याचे दिसून आले. त्यानंतर बँकेने या मालमत्तांचे मूल्य वाढवले ​​होते. परिणामी, मार्च 2025 पर्यंत आयडीबीआयच्या जमीन आणि इमारतींचे एकूण मूल्य 11383 कोटी रुपयांवर पोहोचले होते. मात्र, मार्च 2026 पर्यंत हा आकडा घसरून 8881 कोटी रुपयांवर आला आहे.

या घटीपैकी एक मोठा हिस्सा. जो 2122 कोटी रुपयांच्या बरोबरीचा आहे.दोन विशिष्ट मालमत्तांच्या मूल्यामध्ये केलेल्या कपातीमुळे झाला आहे. या दोन मालमत्ता अशा होत्या का, ज्यांचे मूल्य एका वर्षापूर्वी वाढवण्यात आले होते, हे बँकेने स्पष्ट केलेले नाही. बँकेच्या सहामाही हिशोबावरून असे दिसून येते की, ही घट ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत झाली आहे. याच काळात सरकारने अंतिम निविदा मागवण्याची (8 जानेवारी), त्या प्राप्त करण्याची (6 फेब्रुवारी) आणि त्या उघडण्याची (12 मार्च) प्रक्रिया पूर्ण केली होती, असे अहवालात नमूद केलंय.

मूल्यांकन कसे केले गेले?

प्रति शेअर 81 रुपयांची किंमत योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी सरकारने दोन स्वतंत्र मूल्यांकन अहवालांचा आधार घेतला. 'बीडीओ व्हॅल्युएशन ॲडव्हायझरी' (BDO Valuation Advisory) द्वारे तयार करण्यात आलेल्या एका अहवालात आयडीबीआयच्या (IDBI) प्रत्येक जमीन आणि इमारत मालमत्तेचे मूल्यांकन समाविष्ट होते.मालमत्ता मूल्यमापनकर्त्याने 31 मार्च 2026 रोजीच्या आयडीबीआय बँकेच्या अंतिम हिशोबाच्या आधारे अद्ययावत मूल्यांकन सादर केले होते. याच हिशोबात 2122 कोटी रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. टिपणीत असे म्हटले आहे की, विक्री प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या सचिवांच्या समितीने मूल्यमापनकर्त्याला केवळ अंदाजित आकडेवारी न देता, व्यावसायिकदृष्ट्या अचूक आकडेवारी देण्यास सांगितले होते. या 'सुधारणां'चा अर्थ मूल्यांकनात वाढ होती की घट, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा 'बीडीओ' (BDO) अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.विक्री प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या 'डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट' (DIPAM) च्या 13 ऑगस्टच्या एका अंतर्गत टिपणीचा हवाला देत, अहवालात हे नमूद केले.

डीपॅम सचिव अरुणिश चावला यांनी काय सांगितले?

आयडीबीआय बँकेच्या विक्रीबाबत मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, डीपॅम सचिव अरुणिश चावला यांनी 'बिझनेस स्टँडर्ड'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयडीबीआयकडे दोन प्रमुख मालमत्ता आहेत. त्यांनी हैदराबादमधील एका मालमत्तेचा (प्रशिक्षण केंद्र) उल्लेख करत स्पष्ट केले की, ही मालमत्ता कोणत्याही पक्षाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही आणि ती विक्रीसाठीही पात्र नाही. दुसरी मालमत्ता म्हणजे बँकेचे मुंबईतील मुख्य कार्यालय, जी भाड्याने घेतलेली (लीजवर असलेली) मालमत्ता आहे. चावला यांनी पुढे स्पष्ट केले की, मालमत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या तज्ज्ञाने मालकी हक्काची कागदपत्रे (टायटल डीड्स) आणि जमिनीशी संबंधित अटी व शर्ती तपासून तिचे 'वाजवी बाजार मूल्य' (फेअर मार्केट व्हॅल्यू) निश्चित केले आहे. या मालमत्तांच्या नेमक्या मूल्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, मूल्यमापनाची पद्धत ते समजावून सांगू शकतात, परंतु तपशीलवार आकडेवारी मूल्यमापन अहवालात दिली आहे.

हैदराबाद कॅम्पसची पार्श्वभूमी काय?

हैदराबाद परिसर हा या दोन मालमत्तांपैकी एक असल्याने, त्याचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 50 एकरांवर पसरलेला हा विस्तीर्ण परिसर हैदराबादच्या आयटी कॉरिडॉरमधील 'गचीबोवली' (Gachibowli) येथे स्थित आहे. आयडीबीआय (IDBI) ने ही जमीन कशी मिळवली, यावर न्यायालयातील दस्तऐवजांतून प्रकाश पडतो.1987 मध्ये, राज्य सरकारने आयडीबीआयला कर्मचारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी ही जमीन दिली होती. त्यावेळी जमिनीचा दर 25000 रुपये प्रति एकर इतका होता. या वाटपाच्या अटीनुसार, सार्वजनिक कारणांसाठी सरकार ही जमीन परत घेऊ शकत होते; मात्र, अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी भरपाई ही आयडीबीआयने सुरुवातीला दिलेल्या रकमेपेक्षा जास्त नसेल, असे ठरले होते. 2007 मध्ये, राज्य सरकारने आपल्या एका विभागासाठी यातील 10 एकर जमीन परत घेतली.

2008 मध्ये बँकेने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यात त्यांना यश मिळाले. तत्कालीन न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी जमीन परत घेण्याचा सरकारचा आदेश रद्द केला. 2022 मध्ये, राज्य सरकारने या निकालाच्या विरोधात अपील केले, परंतु त्यातही सरकारचा पराभव झाला. मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, राज्य सरकारने ही जमीन बँकेला दान केलेली नव्हती.

Add Zee News as a Preferred Source

Related News

कोणत्या 3 बँका कोसळल्यास देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल? खुद्द RBIनेच दिली अपडेट

भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीआधीच बँक खात्यात ₹2000;मोबाईलवर असे तपासा

TAGS:
Banking News
india