SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हवामानात बदल होणार, सुपर एल निनोची किती काळ राहणार? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

सुपर एल निनोची स्थिती किती काळ राहणार, याबाबत शास्त्रज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 05, 2026, 02:20 PM IST | Updated: Oct 05, 2026, 02:22 PM IST
Image Credit: Super el nino
Join

जगभरात सध्या एका संकटाने ग्रासले आहे ते म्हणले प्रशांत महासागरात तीव्र होत जाणारे एल निनो. एल निनोमुळं जगभरात एकाचवेळी अनेक घटना घडत आहेत. एकीकडे एल निनोमुळं कोरडा दुष्काळाची स्थिती आहे तर एकीकडे पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. एल निनोचा परिणाम थेट हवामानावर होणार आहे.

एल निनोचा प्रभाव जगात किती राहणार, याबाबत शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे.  भारतात 180 हून अधिक शास्त्रज्ञांनी सुपर एल निनोबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. एल निनोचा प्रभाव वाढत आहे. 2026 चा अखेर आणि 2027च्या सुरुवातीपर्यंत एल निनो अधिक मजबूत स्थितीत पोहोचू शकतो. त्याचा परिणाम भारताच्या हवामानावर पडू शकतो.

प्रशांत महासागारातील पाण्याचे तापमान मोजणारा निनो 3.4 इंडेक्स सप्टेंबरमध्ये 3.0 अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळं 2026-27 च्या हिवाळ्यात सुपर एल निनोची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच हिवाळ्यातही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

फेब्रुवारी 2027पर्यंत एल निनोची शक्यता 100 टक्के आहे. 2027च्या मध्यापर्यंत एल निनोची स्थिती घटून 61 टक्के राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनो कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एल निनोदरम्यान उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमान असामन्यपणे वाढत आहे. वैज्ञानिकांनुसार, प्रशांत महासागरातील तापमान 2.6 डिग्री अंशाने वाढले आहे. तर काही दिवसांत आणखी 4 अंशाने वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे तापमान गेल्या 1000 वर्षांपासून अधिक आहे.

उन्हाचा ताप वाढणार?

हवामान बदलाच्या आणि एल निनोच्या दीर्घकालीन परिणामांमुळे येणारा उन्हाळा अत्यंत तीव्र असणार असून, 2027 च्या उन्हाळ्यापर्यंत याचा प्रभाव जगभरात आणि प्रामुख्याने आपल्या देशावर व राज्यावर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यातील तापमान सरासरीपेक्षा खूप अधिक राहणार असून, तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील पेटणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES