SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगातील सर्वात मोठी IT कंपनी, एकाचवेळी 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार; IT सेक्टरमध्ये सर्वात मोठा भूकंप

भारतासह 48 देशात काम करणारी जगातील सर्वात मोठी IT कंपनी एकाचवेळी 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे. IT सेक्टरमध्ये पुन्हा एकदा मोठी कर्माचरी कपात होणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 27, 2026, 22:28 IST | Updated: Nov 27, 2026, 22:33 IST
Join

SAP Layoff :  IT सेक्टरमध्ये मोठा भूंकप येणार आहे. भारतासह 48 देशात काम करणारी जगातील सर्वात मोठी IT कंपनी एकाचवेळी 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे.  जर्मन सॉफ्टवेअर कंपनी एसएपी (SAP) मध्ये ही मोठी क्रमाचरी कपात होणार आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वेगाने होणाऱ्या वापरामुळे आपल्या व्यवसाय धोरणात बदल होत असल्याचे कारण देत कंपनीने कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.  बाजारमूल्यानुसार एसएपी ही युरोपमधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. 

कर्मचारी कपातीचे  मुख्य कारण

कंपनीने कर्मचारी कपातीची अधिकृत आकडेवारी किंवा इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. कर्मचारी प्रतिनिधींना अधिकृतपणे अहवाल सादर केला आहे. याविषयावर चर्चा सुरु आहे. एआयचा वाढता प्रभाव आणि आर्थिक दबावांमुळे होणाऱ्या बाजारपेठेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एसएपी (SAP) कंपनीत मोठे  धोरणात्मक बदल होत आहेत. कंपनी क्लाउड-आधारित सेवांचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. आपल्या सॉफ्टवेअर पोर्टफोलिओमध्ये एआय (AI) क्षमतांचा समावेश करणे हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनी आपल्या पारंपरिक सॉफ्टवेअर लायसन्सिंग मॉडेलपासून दूर जाऊन सबस्क्रिप्शन-आधारित क्लाउड सेवा आणि एआय-सक्षम एंटरप्राइझ सोल्यूशन्सकडे वाटचाल करत आहे. 

कंपनीने आधीच 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले  

यापूर्वी 2024 मध्ये SAP  कंपनीत मोठी कर्मचारी कपात झाली होती. कंपनीने  10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले.  त्यानंतर झालेल्या नवीन भरतीमुळे कर्मचाऱ्यांची एकूण संख्या पुन्हा अंदाजे 113,000 झाली आहे.  कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 10.3 अब्ज युरो महसूल नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्केनी अधिक आहे. यापैकी, क्लाउड सेवांमधून 6.7 अब्ज युरोची विक्री झाली. निव्वळ नफा देखील वार्षिक तुलनेत 11 टक्केनी वाढून 2.3 अब्ज युरो झाला.  

भारतीयांवरही परिणाम होणार

भारतासह जगभरातील 78 देशांमध्ये एसएपीची कार्यालये आहेत. जगभरात 1,13,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नवी दिल्ली, गुरुग्राम, बंगळूर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता यांसह भारतातील विविध शहरांमधील कार्यालयांमध्ये अंदाजे 18,000 लोक काम करतात. 

मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सेल्सफोर्स कंपनीतही नोकरकपात 

जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत पुनर्रचना योजना जाहीर केल्या आहेत. हे पुनरावलोकन अशा वेळी होत आहे, जेव्हा जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या एआयच्या (AI) माध्यमातून आपली कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि सेल्सफोर्स सारख्या प्रमुख अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे, त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील गुंतवणूकही वाढवली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES