SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

थंडी गायब होणार? एल निनो तीव्रता वाढली, शास्त्रज्ञांकडून हादरवणारा खुलासा!

एल निनोमुळं भारतात परिस्थिती बिघडत चालली आहे. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातोय. भारतातून थंडी गायब होणार का?

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 22, 2026, 12:42 PM IST | Updated: Oct 22, 2026, 01:41 PM IST
Image Credit: super el nino effect india weak monsoon now india winter less
Join

एल निनो ही स्थिती गंभीर होत जात आहे. सध्या असलेली एल निनोची स्थिती तीव्रतेच्या बाबतीत अभूतपूर्व असू शकते असा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपल्या नव्या अंदाजात दिला आहे.

नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत उष्ण कटिंबधीय, प्रशांत सागरी प्रदेशात तापमान 3.8  सेल्सिअसपर्यंत वाढू शकते असे 'डब्ल्यूएमओ'ने म्हटले आहे. गेल्या चार दशकांपासून आम्ही अभ्यासासाठी जी यंत्रणा वापरत आहोत, त्यापलीकडील ही स्थिती असल्याचे 'डब्ल्यूएमओ'च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी निवेदनात नमूद केले आहे.

'एल निनो' 2026च्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर पोहोचेल, परंतु त्याचे परिणाम त्यानंतरही दीर्घकाळ जाणवत राहतील असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. 'एल निनो' मुळे अनेक देशांत सामान्य तापमान आणि पावसाच्या पद्धती विस्कळीत होतात, असंही संशोधनात म्हटलं आहे.

प्रशांत महासागर हेच एल निनोचे मुख्य केंद्र आहे. तापमानाची ही वाढ सामान्य स्थितीपेक्षा खूप अधिक आहे. याचा परिणाम संपूर्ण जगभरात होणार आहे. एल निनोमुळं फक्त उष्णतेच्या लाटाच नाही तर जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडतील. काही ठिकाणी भयंकर दुष्काळ, उष्णता वाढेल. तर काही ठिकाणी पूरस्थितीसारख्या घटना घडतील. त्यामुळं मानवी संकट निर्माण होण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येतात.

2026च्या अखेरीस एल निनो अधिक तीव्र होऊ शकते. तसंच, ही परिस्थिती 2027पर्यंत टिकू शकते. ज्यामुळं एल निनो गेल्या काही महिन्यांपासून अधिक तीव्र होत असून त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होत आहे. या परिणामांमुळे इंडोनेशियामध्ये 2015 नंतरचा सर्वात भीषण वणव्यांचा हंगाम, पूर्व पॅसिफिकमध्ये चक्रीवादळांच्या तीव्रतेत वाढ आणि भारतातील मान्सूनच्या पावसात घट दिसून येत आहे.

एल निनोमुळं मुंबईत पाणीटंचाईचे सावट

'एल निनो' चा वाढता प्रभाव, कमी पाऊसमान, वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची वाढती मागणी आणि बाष्पीभवन आदींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण 90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे मोडक सागर धरणातील पाणीसाठा गेल्या दोन आठवड्यांमध्ये 18 टक्क्यांनी घसरला असून, तो 52 टक्क्यांवर आला आहे. तर, तानसा धरणातील पाणीसाठा तर 90 टक्क्यांखाली घसरल्याने मुंबईची पाणीचिंता वाढली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES