SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतापासून 12000 KM अंतरावर असलेला सर्वात सुंदर देश 2050 पर्यंत जगाच्या नकाशावरुनच गायब होणार; कारण एकच

भारतापासून 12000 KM अंतरावर एक सुंदर देश आहे. मात्र, 2050 पर्यंत हा देश जगाच्या नकाशावरुनच गायब होणार आहे. हा देश सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे देशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Sep 30, 2026, 10:51 PM IST | Updated: Sep 30, 2026, 10:57 PM IST
Join

तुवालू :  भारतापासून 12000 KM अंतरावर एक सुंदर देश आहे. हा देश जगातील सर्वात लहान आणि सुंदर देशांपैकी एक आहे. सध्या हा देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे.  2050 पर्यंत जगाच्या नकाशावरुनच गायब होणार आहे. कारण हा देश समुद्रात बुडत आहे. इथल्या नागरिकांचे दुसऱ्या देशात स्थलांतर केले जात आहे. 

तुवालू असे या देशाचे नाव आहे. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी वसलेला हा देश सध्या वादळी लाटा आणि समुद्राच्या तीव्र प्रवाहांच्या तडाख्याशी झुंज देत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा या देशाला बसला असून देशाचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा देश सध्या जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक बनला आहे. 

समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे बेटाच्या किनाऱ्यांची धूप होत आहे. यामुळे सुमुद्र किनाऱ्या जवळील जमीन हळूहळू पाण्याखाली जात आहे. सुमद्राने मोठा  भूभाग गिळंकृत केला आहे. येथील हजारो लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. वारंवार येणारी वादळे आणि वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे देशातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत.  जर लवकरच उपाययोजना केली नाही, तर येत्या दोन दशकांत हा देश पाण्याखाली जाऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

तुवालूची राजधानी बुडण्याच्या मार्गावर

तुवालू हा देश पॅसिफिक महासागरात, ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्यभागी वसलेले आहे. तुवालू देश भारतापासून अंदाजे 12,000 किलोमीटर अंतरावर आहे. या देशाचे क्षेत्रफळ केवळ 26 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या अंदाजे 12,000 आहे. जेव्हा समुद्राला मोठी भरती येते तेव्हा  तुवालूचा अंदाजे 40 टक्के भूभाग पाण्याखाली जातो.  2050 पर्यंत, तुवालूची राजधानी फुनाफुटीचा अर्धा भाग पाण्याखाली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तुवालू देशाला समुद्राचा धोका

तुवालू हा देश नऊ लहान प्रवाळ बेटांचा समूह आहे. त्यांची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त सुमारे 2 मीटर म्हणजेच 6 ते 10 फूट इतकी आहे. गेल्या शतकात समुद्राची पातळी सरासरी 0.2 मीटरने म्हणजेच जवळपास 7 फूटांनी वाढली आहे. यामुळे खारे पाणी जमिनीत झिरपले आहे. यामुळे गोड्या पाण्याच्या स्रोत नष्ट होत आहेत. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाढत्या समुद्राच्या पातळीव्यतिरिक्त, तुवालूमध्ये चक्रीवादळे आणि समुद्राच्या लाटांसारख्या हवामानातील घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे, ज्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. 

तुवालूचा ऑस्ट्रेलियासोबत करार

तुवालू देश समुद्रात बुडण्याच्या धोक्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे लोक आपला देश सोडून जात आहेत. पुढील पाच ते दहा वर्षांत हा देश राहण्यायोग्य राहणार नाही अशी भिती अनेकांना वाटत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, तुवालूने ऑस्ट्रेलियासोबत 'फालेपिली युनियन ट्रीटी'वर स्वाक्षरी केली आहे.
 

9 नोव्हेंबर 2023 रोजी हा करार करण्यात आला. 28 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृतपणे हा अंमलात आला. या करारानुसार, ऑस्ट्रेलियाला जमीन परत मिळवण्यासाठी आणि फुनाफुटीचे क्षेत्रफळ अंदाजे 6 टक्क्यांनी वाढवण्यासाठी 16.9 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळतील. यामुळे तुवालूला नवीन घरे उपलब्ध होतील.

तुवालूच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलिया सुरक्षित स्थलांतर

या करारानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी जास्तीत जास्त 280 तुवालू नागरिकांना विशेष व्हिसा दिला जातो. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या तुवालू नागरिकांना, ऑस्ट्रेलियन नागरिकांप्रमाणेच आरोग्यसेवा, शिक्षण, निवास, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा लाभांचा पूर्णपणे लाभ मिळतो. थोडक्यात  तुवालूच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलिया सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी हा करार अत्यंत महत्वाचा आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES