अमेरिकेत हिंदू मंदिरावर गोळीबाराचा कट, 19 वर्षांच्या तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
अमेरिकेतली अरोरा इथल्या हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
अमेरिकेतली अरोरा इथून एक भयानक घटना समोर आली आहे. एका हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करून मोठा हत्याकांड करण्याचा डाव समोर आला आहे. हा मोठा हत्याकांडाचा कट उधळण्यात पोलिसांनी यश आलं आहे. 19 वर्षांच्या तरुणाची रायफल जॅम झाल्यामुळे मोठी भयानक घटना होण्यापासून वाचली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण स्वतःला 'श्वेत वर्चस्ववादी निओ-नाझी' असा उल्लेख करत आहे. या तरुणाकडे पोलिसांना हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांविरोधातील हिंसाचाराचे उल्लेख असलेले कागदपत्र आढळले आहेत. सध्या नवरात्रीचे दिवस असताना हा भयानक कट करण्याचा त्या तरुणाने कट रचला होता. पण रायफलमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. पण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेतली भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अलेक्झांड्रोस पापोराकिस असं आहे. तो गेल्या काही दिवसांपासून अरोरा परिसरात हिंदू मंदिरांवर पाळत ठेवून होता. नवरात्रीमुळे मंदिरात सध्या हिंदू भक्तांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. अशातच मोठ्या संख्येने हिंसक लक्ष्य करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.
त्या तरुणाचा कट अपयशस्वी ठरल्यानंतर आरोपी अलेक्झांड्रोस घटनास्थळावरून गेला होता. पण रविवारी एका फास्ट - फूड रेस्टॉरंटमधून त्याने त्याच्या एका सहकाऱ्याला मेसेज करून फोन करण्यास सांगितलं होतं. फोनवर त्याने सांगितलं की, आपण मंदिरावर गोळीबार करण्यासाठी गेलो होतो पण रायफलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे आपण तिथून पळून आलो. पुढे तो हेही म्हणाला की, हिंदू आणि भारतीयांना ठार मारण्याची ही योग्य वेळ आहे आणि आता आपण थांबू शकत नाही. त्याच्या सहकाऱ्याने या संभाषणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून आरोपीला त्याच्या घराबाहेरून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं. तर न्यायाधीशांनी आरोपीला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांना एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ बॉडी आर्मर आढळून आलं. पोलिसांनी ते सर्व सशस्त्र जप्त केली आहेत. दरम्यान या घटनेबद्दल अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी आणि स्थानिक पोलिसांनी जी कारवाई केली आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. तर अमेरिका प्रशासनाकडून सर्व हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर भारतीय समुदायालाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.