SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

घरच्या घरी बनवा अस्सल बिहार स्टाईल लिट्टी-चोखा; जाणून घ्या संपूर्ण कृती

बिहारमधील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक असलेला लिट्टी चोखाबद्दल अनेकांनी ऐकले असेल. अनेकजण या पदार्थाच्या बनवण्याच्या पद्धतींबद्दल त्याचबरोबर या पदार्थाच्या चवीबद्दल अनेकदा प्रशंसा करतात. आज या लेखामध्ये लिट्टी चोखा कसा बनवायचा यासंदर्भात सविस्तर रेसिपी वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 07, 2026, 06:42 PM IST | Updated: Oct 07, 2026, 06:52 PM IST
Join

लिट्टी चोखा हा पदार्थ संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, पण अनेकांना तो कसा बनवायचा याबद्दल माहिती नाही. बिहारमधील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक असलेला लिट्टी चोखाबद्दल अनेकांनी ऐकले असेल. अनेकजण या पदार्थाच्या बनवण्याच्या पद्धतींबद्दल त्याचबरोबर या पदार्थाच्या चवीबद्दल अनेकदा प्रशंसा करतात. अनेक शहरांमध्ये हा पदार्थ मिळणे देखील कठीण आहे त्यामुळे तुम्ही हा स्वादिष्ट पदार्थ घरी अगदी कमी साहित्यासह सहजपणे कसा बनवू शकता. आम्ही अशा टिप्स आणि रेसिपी शेअर करणार आहोत, ज्यामुळे घरातील प्रत्येकजण तुमची प्रशंसा करेल. या लेखामध्ये तुम्हाला हा पदार्थ घरच्या घरी कसा बनवायचा यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.

स्वादिष्ट लिट्टी-चोखा कोणत्या घटकांपासून बनतील?

गव्हाचे पीठ – 2 कप
सत्तू (भाजलेले हरभरे पावडर) - 1 कप
बारीक चिरलेला कांदा - 1
आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
मोहरीचे तेल – 2 चमचे
लिंबाचा रस – 1 चमचा
देशी तूप - लिट्टी तळण्यासाठी
ओवा – 1/2 चमचा
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी

सत्तूचे सारण कसे बनवायचे?

लिट्टी-चोखा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात 1 कप सत्तू घ्या. त्यात 1/2 चमचा कलौंजी आणि 1/2 चमचा आमचूर पावडर घाला. या दोन घटकांमुळे सारणाला एक वेगळी चव आणि हलकी आंबटपणा येतो. आता सत्तूमध्ये 1 छोटा कांदा बारीक चिरून घाला त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा आले-लसूण पेस्ट आणि 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, 1-2 चमचे लिंबाचा रस, 1-2 चमचे मोहरीचे तेल सर्व साहित्य हाताने किंवा चमच्याने चांगले मिसळून घ्या. जेणेकरून मसाले आणि तेल संपूर्ण सत्तूमध्ये व्यवस्थित मिसळून जातील.

चोखा बनवण्याची पद्धत

चोखा बनवण्यासाठी वांगी, टोमॅटो आणि उकडलेले बटाटे तयार ठेवा. आता वांगी आणि टोमॅटो थेट आचेवर त्यांची बाहेरील साल काळी होईपर्यंत परतून घ्या. भाजलेले वांगे आणि टोमॅटो थोडे थंड करून त्यांची साल काढा. आता त्यांना उकडलेल्या बटाट्यांसोबत चांगले कुस्करून घ्या. मॅश केल्यानंतर त्यात मीठ, लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. चव वाढवण्यासाठी मोहरीचे तेल घाला. इच्छित असल्यास, चव अधिक वाढवण्यासाठी तुम्ही थोडा लिंबाचा रस किंवा लसूण देखील घालू शकता. अशा प्रकारे चोखा तयार होईल, जो तुम्ही गरमागरम लिट्टीसोबत खाऊ शकता.
 

लिट्टी बनवण्याची पद्धत

लिट्टी बनवण्यासाठी सर्वात आधी गव्हाच्या पिठात मीठ आणि 1 चमचा तेल घालून मऊ पीठ मळून घ्या. आता पिठाचे छोटे गोळे बनवा आणि त्यांना हलक्या हाताने लाटा. यानंतर, लाटलेल्या पिठाच्या मध्यभागी सत्तूचे सारण ठेवा आणि कडा व्यवस्थित बंद करा. पारंपरिकरित्या, लिट्टी कोळशाच्या आगीवर किंवा तंदूरमध्ये भाजली जाते. ती घरी गॅस स्टोव्ह किंवा एअर फ्रायरचा वापर करूनही बनवता येते, जे तुमच्या येथे उपलब्ध असेल त्यावर तुम्ही बनवू शकता. लिट्टी दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा किंवा भाजा. तयार केलेली लिट्टी गरम तुपात बुडवा. यामुळे तिची चव आणि सुगंध वाढतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES