घरच्या घरी तयार करा बंगाली 'भापा दोई'; फक्त 3 साहित्य आणि झटपट रेसिपी
भापा दोई फक्त तीन साहित्यांपासून तयार करता येते. चला, या लेखात आपण या रेसिपीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फेस्टिव्ह सिझन सुरु होणार आहे आणि त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारे गोड पदार्थ खायला मिळणार आहेत. अनेकजण आता दसरा, दिवाळीला वेगवेगळे पदार्थ आई घरीच तायर करते. सणासुदीच्या दिवसांत पाहुणे घरी आल्यावर किंवा घरच्या लोकांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. आज या लेखामध्ये तुम्हाला स्पेशल पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. बंगाली भापा दोई हा सणासुदीच्या दिवसांत एक उत्तम पर्याय आहे. हा दह्यापासून बनवलेला एक पारंपरिक बंगाली गोड पदार्थ आहे, जो चवीला क्रीमी आणि किंचित गोड असतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बनवण्यासाठी ओव्हनची गरज नसते, कारण ते घरी सहजपणे वाफवून बनवता येते. भापा दोई फक्त तीन घटकांपासून तयार करता येते. चला, या लेखात आपण या घटकांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
भापा डोई रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
घट्ट दही – 2 कप
कंडेन्स्ड मिल्क – 1 कप
वेलचीचा अर्क – 5 थेंब
भापा डोई कशी बनवायची?
भापा डोई बनवण्यासाठी सर्वात आधी भापा दोईमधील पाणी काढून टाकणे आवश्यक असते कारण ते दाट आणि मलईदार होणे गरजेचे आहे. त्यानंतर दही एका स्वच्छ सुती किंवा मलमलच्या कापडात ठेवा. त्यानंतर दही ज्या कपड्यामध्ये ठेवले आहे तो कपडा बांधून ठेवा आणि पाणी निथळण्यासाठी काही तासांसाठी टांगून ठेवा. जर दही आधीच खूप घट्ट असेल, तर या पायरीला कमी वेळ लागेल. घट्ट दही एका मोठ्या भांड्यात घ्या आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी ते चांगले फेटून घ्या. आता, वेलची पूड किंवा वेलची इसेन्स घालून व्यवस्थित मिसळा.
मिश्रण खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता हे मिश्रण एका उष्णतारोधक किंवा स्टीलच्या भांड्यात ओता. एका मोठ्या पातेल्यात थोडे पाणी घाला, त्यात एक स्टँड ठेवा आणि त्यावर भापा दोईचे भांडे ठेवा. मंद आचेवर २० ते ३० मिनिटे भांडे वाफवून घ्या. भांड्याच्या आकारानुसार आणि मिश्रणाच्या प्रमाणानुसार वेळ बदलू शकतो. भापा दोई घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. भापा दोई थंड झाल्यावर काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्याचा टेक्सचर सुधारतो. वाढताना पिस्ते, बदाम किंवा केशर घालून सजवा.