हेल्दी आणि टेस्टी घरच्या घरी बनवा चीज बीटरूट टिक्की, जाणून घ्या सोपी रेसिपी
बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेल्या या टिक्की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. तुम्ही घरीच चीझी बीट टिक्की बनवू शकता. चीज बीटरूट टिक्की कशी तयार करायची याची रेसिपी सविस्तर वाचा.
हिवाळ्याच्या या थंडीमध्ये अनेकदा काहीतरी नवीन आणि टेस्टी, स्वादिष्ट बनवण्याच्या इराद्यात असाल तर तुम्हाला या लेखामध्ये एक खास रेसिपी सांगणार आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेल्या या टिक्की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. संध्याकाळच्या चहाबरोबर नाश्ता म्हणून त्या सर्व्ह करा. बीटचे नाव काढताच अनेक लोक तोंड वाकडे करतात आणि विशेषतः लहान मुले ते खाण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही बीटपासून अशी एखादी गोष्ट बनवू शकता, जिला कोणीही नकार देणार नाही. तुम्ही घरीच चीझी बीट टिक्की बनवू शकता. चीज बीटरूट टिक्की कशी तयार करायची याची रेसिपी सविस्तर वाचा.
चीज बीटरूट टिक्की साठी साहित्य
- 2 मध्यम आकाराचे बीट
- 2 उकडलेले बटाटे
- अर्धा कप ब्रेड क्रम्स
- अर्धा कप किसलेले पनीर
- 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
- 1 टीस्पून आल्याची पेस्ट
- अर्धा टीस्पून गरम मसाला
- अर्धा टीस्पून चाट मसाला
- अर्धा टीस्पून लाल तिखट
- 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- रत्तिकी तळण्यासाठी तेल
चीज बीटरूट टिक्की कशी बनवायची?
चीज बीटरूट टिक्की तयार करण्यासाठी सर्वात आधी बीट स्वच्छ धुवा, त्याची साल काढा आणि ते किसून घ्या. बीटमधील जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी ते हलक्या हाताने पिळून घ्या. मिश्रणात जास्त ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर टिक्की बनवताना ते तुटू शकते. त्यानंतर एका भांड्यामध्ये किसलेले बीट आणि उकडून घेतलेले बटाटे चांगले मॅश करा. त्यानंतर त्यामध्ये ब्रेडक्रंब्स, हिरव्या मिरच्या, आल्याची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला. एकजीव मिश्रण तयार होईपर्यंत सर्वकाही व्यवस्थित मिसळा.
हे ही वाचा
सकाळच्या चहाची मजा दुप्पट करेल ही मूग डाळ टिक्की; जाणून घ्या सोपी रेसिपी
आता तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. ते तळहातावर ठेवून हलकेच दाबा आणि मध्यभागी थोडे किसलेले चीज ठेवा. कडा बंद करून त्यांना टिक्कीचा आकार द्या, जेणेकरून बेकिंग करताना चीज बाहेर सांडणार नाही. एका कढईत थोडे तेल गरम करा. तयार केलेल्या टिक्की मध्यम आचेवर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. टिक्की उलटताना काळजी घ्या, जेणेकरून त्या तुटणार नाहीत आणि त्यातील सारण बाहेर सांडणार नाही. टिक्की दोन्ही बाजूंनी पूर्णपणे शिजल्यावर, त्यांना एका प्लेटमध्ये काढा. तुमच्या गरमागरम, चीझी बीटरूट टिक्की तयार आहेत.