हिवाळ्यात बनवा चवदार 'पाया सूप', सोपी रेसिपी आजच घरी ट्राय करा
Paya Soup Recipe :
Paya Soup Recipe : जर तुम्ही मांसाहारी असाल तर पाया सूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे पाया सूप हाडांना मजबूत देण्यासोबतच हिवाळ्यात तुम्हाला हेल्दी ठेवण्याचं सुद्धा काम करतात. तेव्हा हिवाळ्याच्या सीजन निमित्त तुम्हाला पाया सूपची एक अशी सोपी रेसिपी सांगणार आहोत जी बनवायला सोपी आणि त्यासोबतच खूप चविष्ट लागते. यासोबतच पाया कसे स्वच्छ करावेत याबाबत सुद्धा सांगणार आहोत.
पाया सूपमधून तुम्हाला जिलेटिन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे डी आणि बी12, तसेच कोलेजन प्रथिने यांसारखी विविध पोषक तत्त्वे मिळतात. परिणामी हे सूप हाडे आणि स्नायूंपासून ते त्वचेपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरते. पाया सूप तयार करण्यासाठी सुमारे 10 मिनिटांचा वेळ लागतो आणि ते शिजवण्यासाठी साधारण 40 मिनिटांचा वेळ लागतो.
पाया कसा स्वच्छ कराल?
आवश्यकतेनुसार पाणी, 2 मोठे चमचे व्हिनेगर, चवीनुसार मीठ, 1 किलो बकऱ्याचे पाय (पाया) अर्धा इंच तुकड्यांमध्ये कापलेले (२ पाय)
सुपसाठी साहित्य :
1 मोठा चमचा तेल
2 मोठे चमचे तूप
1 तमालपत्र
2 हिरव्या वेलच्या
2 काळ्या वेलच्या
2 लवंगा
5-6 काळी मिरी
2 मोठे कांदे, चिरलेले
2 हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आले, सोललेले
2–3 लसूण पाकळ्या
थोडी कोथिंबीर
1 किलो बकऱ्याचे पाय (पाय), अर्धा इंच तुकड्यांमध्ये कापलेले
दह्याचे मिश्रण
चवीनुसार मीठ
पाव छोटा चमचा हळद पूड
3-4 कप पाणी
तडक्यासाठी साहित्य :
2-3 मोठा चमचा तूप
2-4 लवंग
एक चुटकी हींग
गार्निशिंगसाठी साहित्य :
1 इंच आले, उभे पातळ कापलेले
2 हिरव्या मिरच्या (बिया काढून बारीक चिरलेल्या)
तळलेला कांदा
कोथिंबीर (चिरलेली)
लिंबाच्या फोडी
पुदिन्याच्या काड्या आणि पाने
पाया कसे स्वच्छ कराल?
एका पातेल्यात पाणी, व्हिनेगर आणि चवीनुसार मीठ घालून पाणी चांगले उकळवून घ्या. त्यात पाया टाका आणि दोन मिनिटे उकळा. पाया स्वच्छ झाल्यावर गॅस बंद करा.
सूप बनवण्याची पद्धत :
एका प्रेशर कुकरमध्ये तूप आणि तेल घ्या. ते गरम झाल्यावर त्यात तमालपत्र आणि काळी मिरी टाका. त्यानंतर, हिरवी वेलची, मोठी वेलची आणि लवंगा घालून त्या नीट तडतडू द्या. यानंतर कांदे, लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या घालून सर्व साहित्य नीट परतून घ्या. कांदे हलके गुलाबी रंगाचे झाल्यावर, त्यात पाया घाला आणि ते हलके तपकिरी होईपर्यंत नीट परतून घ्या. आता तयार केलेले दह्याचे मिश्रण घाला आणि नीट मिसळा. शेवटी, चवीनुसार मीठ, हळद आणि पाणी घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. यानंतर, पातेल्यावर झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. पाया (प्राण्याचे पाय) पूर्णपणे शिजले की गॅस बंद करा. झाकण उघडा, सूप एका मोठ्या भांड्यात गाळून घ्या आणि पुढील वापरासाठी बाजूला ठेवून द्या. आता तयार केलेली फोडणी गाळलेल्या सूपवर ओता, त्यात शिजवलेले पाया घाला आणि नीट ढवळून घ्या. सूप पुन्हा एका पातेल्यात काढून घ्या आणि त्याला उकळी आणा. त्यानंतर ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. सूप एका बाऊलमध्ये काढा, त्यावर ताजी कोथिंबीर, तळलेला कांदा, आले, लिंबाचे काप आणि पुदिन्याची पाने घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.