दिवाळीला बाजारातील मिठाई विसरा, 3 पदार्थांत तयार करा स्वादिष्ट दूध पेडा
सणासुदीच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे बाजारातील मिठाईमधील भेसळ. माव्यापासून साखरेपर्यंत, बाजारातील मिठाईमध्ये असे अनेक घटक मिसळले जातात, जे आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. आजच्या या लेखामध्ये तुम्हाल घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये कसा पेढा तयार करायचा याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत.
दिवाळी काही दिवसात येणार आहे आणि या मंगल समयी घरामध्ये रोषणाई तर पाहायला मिळतेच पण काही तरी गोड बनवणे त्याचबरोबर खरात फरसाण तयार करणे हे स्वयंपाक घरामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ या सणाला तयार करतात. दिवाळीला अनेकजण वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानामधून वेगवेगळ्या प्रकराचे पेढे घरी आणतात. अनेकदा हे भेसळयुक्त पेढे अनेकांना आवडत नाहीत, प्रत्येकाला आनंदाच्या प्रसंगी आपले तोंड गोड करण्यासाठी काहीतरी खास आणि आरोग्यदायी हवे असते. पण सणासुदीच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे बाजारातील मिठाईमधील भेसळ. माव्यापासून साखरेपर्यंत, बाजारातील मिठाईमध्ये असे अनेक घटक मिसळले जातात, जे आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
भेसळयुक्त पदार्थ खाल्ले तर मग त्याचा परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता या दिवाळीला घरीच शुद्ध आणि स्वादिष्ट मिठाई बनवा. आजच्या या लेखामध्ये तुम्हाल घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये कसा पेढा तयार करायचा याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही काही मिनिटांतच मिठाईवाल्याप्रमाणे मऊ आणि तोंडात विरघळणारे दुधाचे पेडे तयार करू शकता.
दूध पेडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दुधाची पावडर - 2 कप
दूध - 1 कप (उकडलेले किंवा साधे)
साजूक तूप - 2 ते 3 चमचे
साजूक खडीसाखर - अर्धा कप (चवीनुसार)
कसा बनवायचा दूध पेडा?
दूध पेडा तयार करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन किंवा कढई घ्या, त्यानंतर गॅस चालू करुन पॅनमध्ये 1 कप दूध आणि 2 कप मिल्क पावडर घाला आणि त्यामध्ये तूपही घाला. तूप घातल्यानंतर चमच्याने हे सर्व साहित्य चांगले मिसळा, जेणेकरून सर्व गुठळ्या नाहीशा होतील आणि एक गुळगुळीत मिश्रण तयार होईल. हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवा, त्यानंतर मिश्रण मंद आचेवर पूर्णपणे गुळगुळीत होईल, तेव्हा गॅस चालूच ठेवा अगदी मंद आचेवर ठेवा. मंद आचेवर असताना पॅनमध्ये चमच्याने ढवळत रहा कारण त्यामुळे पॅनला ते मिश्रण चिकटणार नाही. त्यानंतर मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याला माव्याचा आकार येईल.
हे ही वाचा
कारल्याची चव बदलून टाकणारी चटपटीत चटणी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल
मिश्रण भांड्यापासून सुटून त्याचा गोळा बनू लागल्यावर गॅस बंद करा. चवीनुसार पिठीसाखर आणि थोडी वेलची पूड घालून चांगले मिसळा. जेव्हा मिश्रण हाताला किंचित गरम लागेल, तेव्हा तळहातांना थोडे तूप लावा. मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि तळहातांमध्ये दाबून त्यांना थोडे चपटे करा. अंगठ्याने मध्यभागी हलकेच दाबून त्यांना पेढ्यांचा आकार द्या. तुमचे मऊ आणि चविष्ट दुधाचे पेढे तयार आहेत! ते बारीक चिरलेल्या पिस्त्यांनी किंवा केशरच्या काड्यांनी सजवा.