• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /कारल्याची चव बदलून टाकणारी चटपटीत चटणी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

कारल्याची चव बदलून टाकणारी चटपटीत चटणी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

कारल्याची ही अनोखी आणि टेस्टी रेसिपी एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटेल. घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये ही कारल्याची टेस्टी चटणी कशी प्रकारे बनवायची यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 25, 2026, 11:48 AM IST|Updated: Oct 25, 2026, 12:01 PM IST
joinshare
कारल्याची चव बदलून टाकणारी चटपटीत चटणी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कारले हे अनेकांना नापसंत असते कारण ते कडू लागते, पण कारल्यामध्ये अनेक गुणधर्म असतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकजण तर कारल्याचे नाव ऐकताच बहुतेक लोक नाक मुरडतात, पण कारल्याची भाजी योग्य पद्धतीने आणि योग्य मसाले टाकून तयार केली तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तुम्ही कधी कारल्याची चटणीबद्दल ऐकले आहे का? नसेल ऐकले तर तुमच्यासाठी हा लेख आहे जर कारल्याचे एका अशा मसालेदार चटणीत रूपांतर करता येते, जी खाताना प्रत्येकजण बोटे चाटत राहील. ही रेसिपी खास आहे कारण कडूपणा संतुलित करण्यासाठी यात डाळ, तीळ आणि शेंगदाणे यांचे एक अप्रतिम मिश्रण वापरले आहे.

कारल्याची ही अनोखी आणि टेस्टी रेसिपी एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटेल. घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये ही कारल्याची टेस्टी चटणी कशी प्रकारे बनवायची यासंदर्भात सविस्तर वाचा.

कारल्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

कारले – 2 मध्यम आकाराची (पातळ कापलेली)
पांढरे तीळ – 2 मोठे चमचे
शेंगदाणे – 3 मोठे चमचे
चणा डाळ – 1 मोठा चमचा
उडीद डाळ – 1 मोठा चमचा
लसूण – 5-6 पाकळ्या
जिरे – 1 चमचा
धणे – 1.5 चमचा
कढीपत्ता – 8-10 पाने
हिंग – 1 चिमूटभर
आमचूर पावडर – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
मोहरीचे तेल – 2-3 मोठे चमचे

कशी बनवायची कारल्याची चटणी?

कारल्याची चटणी तयार करण्यासाठी सर्वात आधी कारल्याच्या चकत्यांना थोडे मीठ लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, त्यांना हलकेच दाबून मोकळे करा. यामुळे कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यानंतर कढई घ्या आणि ती गॅसवर ठेवा त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरीचे तेल घाला, त्यामध्ये चणे, उडीद डाळ आणि शेंगदाणे घालून मंद आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत परता. त्यात पांढरे तीळ घालून हलके तडतडेपर्यंत परता. त्यानंतर जिरे, धणे आणि कढीपत्ता घाला, सुगंध आल्यावर हिंग आणि लसूण घालून हलके तपकिरी होईपर्यंत परता. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून मध्यम आचेवर कारले परतून घ्या आणि थोडे कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत शिजवा.

पुढील स्टेप म्हणजेच चटणीचे वाटण, चटणीचे वाटण तयार करण्यासाठी सर्व भाजलेले साहित्य थंड होऊ द्या. ते मिक्सरमध्ये घालून त्यात आमचूर पावडर आणि मीठ टाका. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून जाडसर किंवा गुळगुळीत चटणीच्या घट्टपणात वाटून घ्या. तयार झालेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये थोडे मोहरीचे तेल घाला. जर तुम्हाला जास्त आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही सुक्या आंब्याच्या पावडरचे प्रमाण वाढवू शकता. चटणी तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये 3-4 दिवस साठवून ठेवता येते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
recipes
Marathi News
Lifestyle News