पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका
दैनंदिन जीवनामधील अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे आपल्याला कॅन्सरच्या आणखी जवळ घेऊन जाते. आज या लेखामध्ये पुरुषांच्या कोणत्या सवयी आहे ज्यामुळे कॅन्सरचा धोका त्यांना असू शकतो यासंदर्भात तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
तणावपूर्ण आयुष्य त्याचबरोबर काम, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त अनेकदा स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देता येत नाही. झोप न होणे त्याचबरोबर, दिवसभर तणाव असणे त्यामुळे अनेक चुकीच्या सवयी लागतात. मग ते धूम्रपान करणे किंवा रोज मद्यपान करणे हा गोष्टी जीवनशैलीचा भाग बनतात. सुरुवातीला या सवयी कदाचित लक्षात येत नाही पण जसजसे वय वाढते त्यानंतर आपल्याला शरीरावर होणारे दुष्परिणाम दिसून येतात. दैनंदिन जीवनामधील अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे आपल्याला कॅन्सरच्या आणखी जवळ घेऊन जाते. आज या लेखामध्ये पुरुषांच्या कोणत्या सवयी आहे ज्यामुळे कॅन्सरचा धोका त्यांना असू शकतो यासंदर्भात तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
धूम्रपान आणि तंबाखू
अनेकांचा असा समज आहे की अधूनमधून सिगारेट ओढणे किंवा तंबाखू खाल्याने कोणतेही मोठे नुकसान होत नाही पणे हे यामध्ये अजिबात तथ्य नाही. सिगारेट किंवा तंबाखू हे दोन्हीही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तंबाखूचे सेवन केल्याने फुफ्फुसे, तोंड, घसा, मूत्राशय आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सातत्याने खोकला येणे आणि खोकला बराच काळ टिकून राहणे त्याचबरोबर आवाजामध्ये बदल होणे, तोंडातील व्रण बरे होत नसतील किंवा अन्न गिळण्यास त्रास होत असेल, तर लगेचच डॅाक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
मद्यपान करणे म्हणजेच दारु पिण्याची सवय असणे
अनेकजण काही कार्यक्रम असेल तेव्हा मद्यपान करतात किंवा मग काहीजण हे दररोज मद्यपान करतात. वारंवार किंवा अतिप्रमाणात मद्यपान केले तर यकृत, तोंड, अन्ननलिका आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोका जास्त वाढू शकतो. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तीना काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका असू शकतो. अशावेळी सातत्याने थकवा येणे किंवा अपचन आणि वारंवार होणारा यांसारख्या समस्यांना नेहमीच सामान्य समजून दुर्लक्ष करणे योग्य नाही यावेळी डॅाक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
हे ही वाचा
दररोज कच्चा कांदा खाण्याचे जबरदस्त फायदे; रिसर्चमध्ये समोर आली माहिती
आरोग्य तपासणी पुढे ढकलणे
अनेक पुरुष त्यांच्या समस्या गंभीर होईपर्यंत डॉक्टरांकडे जात नाहीत. काहींना वाटते की समस्या आपोआप बरी होईल, तर काही जण वेळेअभावी तपासणी पुढे ढकलतात. तथापि, आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तुमचे वय, कुटुंबातील कर्करोगाचा इतिहास आणि तुमचे स्वतःचे आरोग्य यानुसार, तुम्ही आवश्यक तपासण्या आणि नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे.
पोटावरील चरबी
आजकाल अनेक पुरुषांना कमी वयामध्ये पोट सुटत आहे आणि कामाच्या सवयींमुळे देखील त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो. दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणे, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी अशी अनेक कारणे ही पोटावरील चरबी वाढण्याची असू शकतात. पोटाच्या आत साठलेल्या चरबीला व्हिसेरल फॅट म्हणतात. शरीरीमधील फॅट वाढल्याने अतिरिक्त प्रमाण मधुमेह आणि हृदयरोग, तसेच काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते. यामध्ये मोठ्या आतड्याचा, यकृताचा आणि स्वादुपिंडाचा कर्करोग समाविष्ट आहे.
अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.