हाय कोलेस्टेरॉलची ही लक्षणं दिसताच व्हा सतर्क; दुर्लक्ष पडू शकतं महागात
शरीर योग्यरित्या काम करण्यासाठी शरीराला कोलेस्ट्रॅालची गरज असते. पण जर शरीरामध्ये जास्त कोलेस्ट्रॅाल असेल तर समस्या निर्माण होऊ शकतात.
रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, कोलेस्ट्रॉल हा यकृतामध्ये तयार होणार एक मेणासारखा पदार्थ आहे. शरीर योग्यरित्या काम करण्यासाठी शरीराला कोलेस्ट्रॅालची गरज असते. पण जर शरीरामध्ये जास्त कोलेस्ट्रॅाल असेल तर समस्या निर्माण होऊ शकतात. रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होऊन प्लाक तयार होऊ शकतो. जसा प्लाक जमा होतो, तसतसा धमन्यांचा आतील भाग अरुंद होऊ लागतो आणि इतर अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याची कोणकोणती लक्षणे असतात यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.
वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी लवकर ओळखणे आणि जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कोणाला जास्त असतो आणि त्याची लक्षणे काय आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा
- उच्च कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होऊ शकतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे शरीरातील समस्या वाढतात. यामुळे छातीत दुखू शकते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते.
- उच्च कोलेस्ट्रॉलची थेट लक्षणे नसतात. तथापि, छातीत दुखणे, लठ्ठपणा आणि डोळे पिवळे पडणे ही संभाव्य लक्षणे असू शकतात.
- टाईप 2 मध्ये मधुमेह आणि लठ्ठपणा यासांरख्या काही शरीरातील आरोग्याच्या समस्यांमुळे उच्च कोलेस्ट्रॅालचा धोका वाढू शकतो. सॅचुरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असलेला आहार आणि व्यायामाचा अभाव हे वाईट कोलेस्ट्रॉलसाठी धोक्याचे घटक आहेत.
- उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, त्याचे धोक्याचे घटक कमी करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, सक्रिय राहणे आणि कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे.
- उच्च कोलेस्ट्रॉलचे निदान करण्यासाठी, डॉक्टरांकडून तुमचे कोलेस्ट्रॉल तपासून घेणे महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल तपासणी केव्हा करावी याबद्दलही तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील.