किम जोंग उन : उत्तर कोरिया हुकूमशहा किम जोंग उन आपल्या कृत्याने सातत्याने जगभरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अनकेदा आपल्या शक्तिशाली शस्त्रांची प्रात्यक्षिक दाखवत तसेच अणु चाचण्या घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता मात्र, पहिल्यादांच किम जोंग उन यांनी कोणत्याही शस्त्राचा वापर अथवा थेट हल्ला न करता जगाला हादरवून सोडले आहे. उत्तर कोरियात वयाच्या 11 व्या वर्षापासून भयानक प्रशिक्षण देऊन ही गुप्त आर्मी उभारली जात आहे. उत्तर कोरियाच्या या गुप्त सैन्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. उत्तर कोरियाचे हे गुप्त सैन्य
अलीकडेच मोठा सायबर हल्ला झाला आहे. 6.3 अब्ज डॉलर्सच्या बायनान्स हॅकने जगात खळबळ माजली. या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याच्या तपासाचे धागेदोरे थेट उत्तर कोरियापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या 'ट्रेडरट्रेटर' नावाच्या हॅकिंग गटाने हा हल्ला केल्याचा दावा अमेरिकेची एफबीआय (FBI) आणि क्रिप्टो प्लॅटफॉर्म बायनान्स यांनी केला आहे. उत्तर कोरियाने नेहमीप्रमाणेच आरोप फेटाळून लावले आहेत. हा अमेरिकेचा एक राजकीय डाव असल्याचा पलटवार उत्तर कोरियाने केला आहे. आर्थिकदृष्ट्या एकाकी असलेला देश इतकी धोकादायक आणि अत्याधुनिक सायबर सेना कशी काय विकसित करू शकतो? प्रसारमाध्यमांचे अहवाल, तज्ज्ञ आणि उत्तर कोरियातून पलायन केलेल्यांच्या साक्षींमधून समोर येणारे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.
उत्तर कोरियात गुप्त सायबर सैन्य कार्यरत आहे. वयाच्या 11 व्या वर्ष्यापासून हॅकर्सना ट्रेनिंग दिले जात आहे. उत्तर कोरियामध्ये हॅकर्स घडवण्याची प्रक्रिया ही कोणत्याही अल्पकालीन योजनेचा भाग नाही. अनेक दशकांपासून पद्धतशीर आणि धोरणात्मक पद्धतीने लहान वयातच मुलांना हॅकिंगचे ट्रेनिंग दिले जात आहे.
उत्तर कोरियातील सर्वा शाळांमधून गणित आणि संगणकशास्त्रामध्ये अपवादात्मक प्रतिभा दाखवणाऱ्या 150 ते 200 मुलांची निवड केली जाते. 11 ते 12 वयोगटातील ही मुलं आहेत. निवडक झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष संगणक संस्थांमध्ये पाठवले जाते. वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो.
विद्यापीठातील शिक्षण आणि कठोर छाननीनंतर निवडक मुलांना लष्कराच्या सायबर युनिटमध्ये सामील करून घेतले जाते. किम ह्युंग-ग्वांग, एक उत्तर कोरियन निर्वासित, ज्याने एकेकाळी दक्षिण कोरियामध्ये या हॅकर्सना प्रशिक्षण दिले होते. किम जोंग उनचे "गुप्त शस्त्र" आहे. त्यांचा विश्वास आहे की, जगात दुसरा कोणताही देश मुलांना त्यांची संमती न घेता, केवळ सरकारी सायबर एजंट बनण्यासाठी इतके सखोल प्रशिक्षण देत नाही असं ह्युंग-ग्वांग म्हणाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्ययावत गणित, परदेशी भाषा, क्रिप्टोकरन्सी प्रणाली आणि परदेशी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे रिव्हर्स-इंजिनिअरिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. ज्या मुलांची मुख्य हॅकिंग टीममध्ये निवड होत नाही त्यांना पाश्चात्य कंपन्यांमध्ये रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कामाला पाठवले जाते. यातून देशाला परकीय चलन मिळते.
1998 मध्ये उत्तर कोरियाने आपले पहिले सायबर युनिट स्थापन केले. परंतु 2011 मध्ये किम जोंग उन सत्तेवर आल्यानंतर या विभागाचे महत्त्व झपाट्याने वाढले. 2013 मध्ये, किम जोंग उनने जाहीरपणे एक मोठी घोषणा केली. अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांप्रमाणेच सायबर युद्ध हे त्याच्या लष्कराचे सर्वंकष हल्ल्याचे शस्त्र आहे. सुरुवातीला, हे हॅकर्स केवळ बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराच्या वेबसाइट्स चालवून पैसे गोळा करत होते. परंतु जसजशी त्यांची क्षमता वाढत गेली, तसतशी त्यांची लक्ष्येही विस्तारली.
"ट्रेडरट्रेटर" हा उत्तर कोरियाच्या कुख्यात "लाझारस ग्रुप" (APT38) चा एक भाग असल्याचा दावा एफबीआयने केला आहे. 2022 मध्ये रोनिन ब्लॉकचेन नेटवर्कमधून कोट्यवधी डॉलर्स चोरल्याचा आरोप या ग्रुपवर होता. बायनान्स हॅकमध्ये, हॅकर्सनी एक अत्यंत कल्पक युक्ती वापरली. बनावट नोकरीच्या मुलाखती आणि जाहिरातींमध्ये लपवलेल्या दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअरचा वापर करून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रणाली ताब्यात घेण्यासाठी अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा फायदा घेतला. 2024 च्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाच्या सायबर युद्ध नेटवर्कमध्ये सध्या अंदाजे 8,400 लोक कार्यरत आहेत असा दावा केला जातो. किम जोंग उन उन यांच्या गुप्त सायबर आर्मीची जगातील डिजीटल सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.