मेघालय : दिवाळीआधी भारतात मोठा राजकीय भूकंप आला आहे. मेघालय राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (यूडीपी) या प्रादेशिक पक्षाच्या 12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष बदलला आहे. अचानक 11 आमदार फुटल्याने मेघालयचे राजकीय गणित बिघडले आहे. सरकारच धोक्यात आले आहे.
यूडीपीच्या 11 आमदारांनी पक्ष सोडला आहे. या बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर 3 जण मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) मध्ये सामील झाले आहेत. या मोठ्या पक्षांतरामुळे विधानसभेत यूडीपीचे केवळ एकच आमदार राहिला आहे. मेटबाह लिंगडोह असे या आमदाराचे नाव आहे. ते पक्षाध्यक्ष आहेत.
आमदारांच्या बंडखोरीमुळे पक्षात उभी फूट पडली आहे. राजकीय परिस्थिती पाहता, यूडीपी अध्यक्ष मेटबाह लिंगडोह यांनी मेघालय मंत्रिमंडळातील आपल्या मंत्रीपदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. मेघालय हे ख्रिस्ती-बहुल राज आहे. मेघालयमध्ये आलेल्या या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणाला होणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पक्ष नेतृत्वामुळे मेघालयच्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीत मोठा राजकीय भूकंप आला आहे. यूडीपी आमदार नेतृत्व आणि संघटनेबाबत असंतोष निर्माण झाला होता. सप्टेंबर 2025 मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल झाले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते पॉल लिंगडोह आणि किर्मेन शिला यांच्या जागी मेटबाह लिंगडोह आणि लखमेन रिम्बुई यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे आमदारांमध्ये पक्षात नाराजी पसरली.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांनी काही मागण्या केल्या आहेत. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये खासी भाषेचा समावेश करावा अशी प्रमुख मागणी आहे. कोळसा खाणकामाचा मुद्दा देखील उपसस्थित केला आहे. राज्यात बाहेरील लोकांच्या प्रवेश तसेच इतर प्रश्नांचा समावेश आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांना पक्षाच्या नेतृत्वाकडून हे मुद्दे सोडवण्याचे आश्वासन मिळाल्याचे वृत्त आहे.
यूडीपी हा मेघालयाच्या राजकारणातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने 12 जागा जिंकल्या. मात्र, 3 वर्षात पक्षात मोठी फूट पडली. यूडीपीचे आठ आमदार भाजपमध्ये तर तीन आमदार एनपीपीमध्ये सामील झाले. मेटबाह लिंगडोह हे एकमेव आमदार राहिले आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. या घडामोडीनंतर 31 ऑक्टोबर रोजी लिंगडोह यांनी कॉनरॅड संगमा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 11 आमदारांनी पक्ष सोडल्याने मंत्री म्हणून काम करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
यूडीपी पक्षाच उभी फूट पडली असली तरी कॉनरॅड संगमा यांच्या सरकारवर याचा परिणाम झालेला नाही. मेघालय विधानसभेत 60 सदस्य आहेचय सत्ताधारी एनपीपीचेच 36 आमदार आहेत, तर भाजप देखील सत्तेत आहे. 8 नवीन आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपला लॉटरी लागली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या 10 वर पोहचली झाली आहे. एनडीए/एमडीए आघाडीने 31 बहुमताचा आकडा सहजपणे ओलांडला आहे. एकंदरीत, या संपूर्ण राजकीय नाटकात जर कोणाला सर्वात मोठी लॉटरी लागली असेल, तर ती भाजपला लागली आहे.