• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघात एवढा भीषण होता यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 06, 2026, 06:01 PM IST|Updated: Nov 06, 2026, 06:58 PM IST
joinshare
देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

2

अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

3

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरची जबरदस्त फलंदाजी, टीम इंडियाने 10 विकेट्सने जिंकला सामना

4

6,6,6,6,4,4,4,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा आशिया चषकमध्ये कहर! पाडला चौकार आणि षटकारांचा पाऊस

5

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आता सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोटला देवदर्शनासाठी हे कुंटुंब सकाळी कल्याणहून निघाले होते. दुपारी 3 च्या सुमारास मोहोळ तालुक्यात कंटेनरला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली, दरम्यान जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

झालेल्या या भीषण अपघातामध्ये पार्थ तुषार भारंबे या 8 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. विलास चांगु भारंबे (वय 66) आणि शोभा विलास भारंबे (वय 63, तिघेही रा. कल्याण) यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

हे ही वाचा

अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

अपघाताचे नेमके कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे, या आपघातामध्ये झालेल्या मृत व्यक्तींची ओळख पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर कारण स्पष्ट होईल. धडक लागल्यानंतर जागीच तिघांचा मृत्यू झाला तर मृत आणि जखमी रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्यानंतर लगेचच मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांचा पुढील तपास या प्रकरणामध्ये सुरु आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Marathi News