• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

वैष्णवी हगवणे प्रकरणात लता हगवणे, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना सशर्त जामीन

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 03:20 PM IST|Updated: Nov 06, 2026, 03:22 PM IST
joinshare
वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...
Image Credit: Pune Vaishnavi Hagawane Death Case

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

2

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

3

भारत-बांग्लादेश तणाव संपला, 6 सामन्यांची मालिका होणार? दौऱ्याला ग्रीन सिग्नल

4

'किंग'मधील दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन वाद, थेट भाजप आमदाराने शाहरुखलाच दिला इशारा

5

सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तीन आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी प्रत्येक अर्जदाराची भूमिका, उपलब्ध पुरावे आणि तपासाची प्रगती यांचा आढावा घेतल्यानंतर हा आदेश दिला आहे.

वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिन्ही आरोपींना प्रत्येकी 25 हजारांना वैयक्तिक जातमुचकल्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन जामीनदारांवर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. जामीनदारांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली असून तोपर्यंत तात्पुरत्या रोख जामिनावर सुटका करण्याची मुभा दिली आहे.

न्यायालयाने काय म्हटलं?

साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करुन नये, अशा कडक अटी कोर्टाने घातल्या आहेत. इतकंच नव्हे तर, पुढील सहा महिने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी बावधन पोलीस ठाण्यात हजर राहणे बंधनकारक आहे. जामीन आदेशाला तीन आठवड्यांची स्थगिती देण्याची तक्रारदाराची मागणी न्यायालयाने फेटाळली असून जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, मुख्य खटला सुरू राहणार असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिने 16 मे 2025 रोजी गळफास घेत जीवन संपवले होते. या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, या प्रकरणात,  लग्नामध्ये ५१ तोळे सोने आणि एक एसयूव्ही गाडी मिळाल्यानंतरही, जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा उल्लेख होता.

कुटुंबीयांकडून छळाचे आरोप

लग्नात 51 तोळे सोने आणि लक्झरी SUV गाडी दिल्यानंतरही जमिनीच्या खरेदीसाठी सासरच्या मंडळींकडून 2 कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी होत होती, ज्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या सुमारे 30 खुणा आढळल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले व हत्येचा संशय व्यक्त केला गेला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime
Pune News