• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारत-बांग्लादेश तणाव संपला, 6 सामन्यांची मालिका होणार? दौऱ्याला ग्रीन सिग्नल

भारत-बांग्लादेश तणाव संपला, 6 सामन्यांची मालिका होणार? दौऱ्याला ग्रीन सिग्नल

2026 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकामध्ये बांग्लादेशच्या संघाने बहिष्कार टाकला होता, आता यावर बांग्लादेशच्या एका मुख्य अधिकाऱ्याने यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 06, 2026, 03:01 PM IST|Updated: Nov 06, 2026, 04:33 PM IST
joinshare
भारत-बांग्लादेश तणाव संपला, 6 सामन्यांची मालिका होणार? दौऱ्याला ग्रीन सिग्नल

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

2

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

3

भारत-बांग्लादेश तणाव संपला, 6 सामन्यांची मालिका होणार? दौऱ्याला ग्रीन सिग्नल

4

'किंग'मधील दीपिका पादुकोणच्या ड्रेसवरुन वाद, थेट भाजप आमदाराने शाहरुखलाच दिला इशारा

5

सर्वोच्च न्यायालयाचा OBC आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिला धक्का

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मागील काही काळापासून भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मागील काही काळापासून टीम इंडियाने बांग्लादेश दौरा केला नाही आणि तर बांग्लादेशने देखील भारतामध्ये मालिका किंवा सामने खेळण्यास नकार दिला आहे. 2026 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकामध्ये बांग्लादेशच्या संघाने बहिष्कार टाकला होता, कारण त्याचे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यामध्ये तणाव आणखीनच वाढला होता. आता यावर बांग्लादेशच्या एका मुख्य अधिकाऱ्याने यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

मागील काही काळापासून भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या मालिका सातत्याने रद्द करण्यात आल्या होत्या. आता नवीन वर्षामध्ये भारताचा संघ हा बांग्लादेश दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी अद्याप याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार दोन्ही मंडळांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघ आपल्या बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तेवढेच टी20 सामने खेळू शकतो. 

हे ही वाचा

भारताचा ऐतिहासिक विजय! आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर सहाव्यांदा कोरलं नाव

बांग्लादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांनंतर बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर केले होते. त्यानंतर दोन्ही देशामध्ये तणाव जास्त वाढला होता, त्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध बिघडले होते. परिस्थिती इतकी बिघडली होती की बांगलादेशने भारतात आयोजित टी20 विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. आता बांग्लादेशमध्ये नवीन सरकार आले आहे त्यानंतर भारत आणि बांग्लादेशमध्ये संबंध पुन्हा नव्याने सुधारत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश दौऱ्यासाठी जागा निर्माण करण्याकरिता झिम्बाब्वेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. नवीन वेळापत्रकात ऑस्ट्रेलिया मालिकेच्या तयारीचाही विचार करावा लागेल, कारण 21 जानेवारीपासून सामने सुरू होण्यापूर्वी संघाला कसोटी मालिकेची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. टीम इंडियाने शेवटचा बांग्लादेश दौरा 2022 मध्ये केला होता. जिथे तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले गेले होते. जर भारतीय संघाने जानेवारी 2027 मध्ये बांगलादेश दौरा केला, तर चार वर्षांहून अधिक काळानंतर द्विपक्षीय क्रिकेटसाठी भारताने केलेला हा पहिलाच दौरा असेल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Sports News