एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय अंडर 19 संघाची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघाचा आज चौथा सामना खेळवण्यात आला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नेपाळला पराभूत केले. भारताच्या संघाने नेपाळला 10 विकेट्सने पराभूत केले आहे, लक्ष्य राइचंदानी याच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागच्या मुलाने दमदार कामगिरी करुन पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.
टीम इंडियाची दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भारतीय अंडर 19 संघामध्ये पदार्पण केले होते. तो सध्या आशिया चषकमध्ये कमालीची कामगिरी करताना दिसत आहे, आज नेपाळविरुद्ध नुकताच सामना पार पडला या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने कमालीची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये आर्यवीर सेहवानने 52 चेंडूमध्ये 70 धावा केल्या यामध्ये त्याने 4 चौकार आणि 7 चौकार मारले. त्याच्या या खेळीनंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Aaryavir Sehwag gets underneath it and sends it sailing over long-on! Watch #INDvNEP in the #DPWorldMensU19AsiaCup2026, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV https://t.co/9QhEUYHYUf
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 6, 2026
भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये नेपाळच्या संघाने पहिले फलंदाजी करत भारताने नेपाळला 128 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने हे लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि 10 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतीय अंडर 19 गोलंदाजाची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. यामध्ये भारताच्या अर्जुन राजपूत आणि इशान सूड यांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये इशान सूड याने संघासाठी 10 ओव्हर टाकल्या यामध्ये त्याने फक्त 18 धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतले.
हे ही वाचा
अर्जुन राजपूतची आजच्या सामन्यामध्ये सर्वांना चकीत करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याने आजच्या सामन्यात टीम इंडियाला तीन विकेट्स मिळवून दिले. यशवीर गौडने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले तर मनल चौहान आणि काव्या पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.