• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; डायरेक्ट नवा GRचं काढला

महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; डायरेक्ट नवा GRचं काढला

महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. एसआयआर नोंदणी संदर्भात नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 06, 2026, 09:11 PM IST|Updated: Nov 06, 2026, 09:16 PM IST
joinshare
महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; डायरेक्ट नवा GRचं काढला

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
ना शस्त्र, ना थेट हल्ला; हुकूमशहा किम जोंग उनच्या गुप्त सैन्याने जगाला हादरवून सोडले! उत्तर कोरियात दिले जाते भयानक प्रशिक्षण

ना शस्त्र, ना थेट हल्ला; हुकूमशहा किम जोंग उनच्या गुप्त सैन्याने जगाला हादरवून सोडले! उत्तर कोरियात दिले जाते भयानक प्रशिक्षण

2

महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; डायरेक्ट नवा GRचं काढला

3

आयसीसीची मोठी घोषणा! क्वालिफायर सामने 'या' देशात होणार, 8 संघ एकमेकांशी भिडणार

4

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये होणार बदल? कर्णधार गिल कोणाला देणार संधी?

5

एकाच पक्षाच्या 12 पैकी 11 आमदारांनी रातोरात पक्ष बदलला; 1 आमदारामुळे BJP ला जॅकपॉट लागला? भारतात सर्वात मोठा राजकीय भूकंप!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मतदार नोंदणी प्रक्रिया : महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांमध्ये विशेष मतदार नोंदणी प्रक्रिया (SIR) सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने  7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत  सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एसआयआर (SIR) संदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

भारतीय निवडणूक आयोगाने  SIR नोंदणीबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. या नव्या आदेशानुसार ज्या राज्यांमध्ये सध्या विशेष मतदार नोंदणी प्रक्रिया (SIR) सुरू आहे, तिथे मसुदा मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली जाणार आहगे. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा,  नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांमझध्ये हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. यादीतून नावे वगळलेल्या मतदारांचे प्रतिनिधी (BLOs) ते खरोखरच त्याच पत्त्यावर राहत आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घरी पुन्हा भेट देणार आहेत.

निवडणूक आयोगाचे निर्देश

ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची यादी संबंधित मतदान केंद्रांवर लावण्यात यावी.  जेणेकरून मतदार आपली नावे तपासू शकतील आणि ती पुन्हा समाविष्ट करून घेऊ शकतील असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाने या उद्देशासाठी एक अर्जही जारी केला आहे. ज्यांना गणना अर्ज देण्यात आले होते, परंतु पडताळणीदरम्यान हे अर्जदार गैरहजर होते. किंवा त्यांची  बदली झाली. किंवा मृत किंवा दुबार म्हणून त्यांना वर्गीकृत केल्याने मसुदा यादीतून वगळण्यात आले होते अशा  अशा मतदारांना सवलत दिली जाणार आहे.

निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश

कोणताही पात्र मतदार अंतिम मतदार यादीत समाविष्ट होण्याच्या संधीपासून वंचित राहणार नाही. यादीत कोणतीही बनावट किंवा दुबार नावे समाविष्ट होणार नाहीत याची खरबदारी घ्यावी. यात कोणतीही चूक होणार नाही याची कडक खरबदारी घेण्याचे सक्त निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

बिहार आणि पश्चिम बंगालसह 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर (SIR) प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे. मतदार यादीच्या सतत अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत गहाळ मतदारांची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात, अंतर्गत कार्यवाटप तसचं एका अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले होते.  कॅबिनेट सचिवांना लिहिलेल्या पत्रात आयोगाशी किंवा त्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित कोणत्याही धोरणात्मक बाबीचा उल्लेख नव्हता असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.  हे पत्र निवडणूक आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कामाशी संबंधित होते.  दोन्ही निवडणूक आयुक्तांचे निर्देश असूनही, संबंधित अधिकाऱ्याने जारी केलेल्या कामाच्या पुनर्वितरणाच्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही असं निवडणूक आयोगाने आदेशात म्हंटले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Indian Politics
Political News