बुलढाण्यात तिहेरी हत्याकांड! जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणामधील थरारक घटनेमुळे अख्खं गाव हादरलं. मुलाने जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची हत्या केली.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणामध्ये तिहेरी हत्याकांडची घटना समोर आली आहे. लेकाने आपल्या जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची हत्या केली आहे. दीपक फत्तेसिंह सुरडकर असं आरोपीचं नाव आहे. या तिघांची हत्या त्याने धारदार चाकूने केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून तो फरार झाला आहे. तर मृतांमध्ये सरस्वती फत्तेसिंह सुरडकर यांचं वय 70 वर्ष, संजय फत्तेसिंह सुरडकर हा 55 वर्षांचा तर 25 वर्षीय पुतण्या रणजीत संजय सुरडकर अशी त्यांची नावं आहेत. या तिहेरी हत्याकांडानंतर सोमठाणा गालृवासह संपूर्ण चिखली तालुक्यात भीतीदायक वातावरण आहे. तर आरोपीचं नाव दीपक सुरडकर असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तिहेरी हत्याकांडमागील कारण काय?
पोलिसांनी तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरु केला असून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दीपकच्या हिश्श्याची शेती त्याच्या आईने भावाच्या नावावर केली. या रागातून दीपकने सर्वांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. मात्र हत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान फरार आरोपी दीपक सुरडकर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक ७ परिसरात गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडलीय. दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीला भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.धडकेनंतर तरुणीने प्रसंगावधान राखत डंपरचे बोनेट पकडत स्वतःचा जीव वाचविल्याने मोठा अनर्थ टळला.या संपूर्ण अपघाताचा थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघाताची दृश्ये पाहिल्यानंतर तरुणीचे नशीब बलवत्तर होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, भर लोकवस्तीत झालेल्या या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे क्रिकेट सामना संपल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या कल्याणच्या दोन १६ वर्षीय खेळाडूंचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सौरव झा आणि शुभम यादव अशी या मृत खेळाडूंची नावे आहेत. १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी ही मुले कल्याणहून आली होती. सामना झाल्यानंतर मैदानालगतच्या धोकादायक डोहात पोहण्यासाठी त्यांनी उडी घेतली; मात्र पाण्याखालील दगडावर आदळून गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही पाण्यातच अंत झाला. या घटनेने क्रीडा वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पूर्णगड पोलीस पुढील तपास करत आहेत.