SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जरांगेच्या 500 कोटींचे आरोपावर सर्वात मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांचे थेट मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश; कोणाच्या अडचणी वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फॉरेन्सिक तपासणीची घोषणा केली. एसआयटी चौकशीची मागणी, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आणि प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 26, 2026, 03:09 PM IST | Updated: Oct 26, 2026, 03:17 PM IST
Image Credit: मुख्यमंत्री फडणवीस
Join

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय संबंध, तसेच मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिलेयत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

नेमका 500 कोटींचा आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोबर 2026 रोजी दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही रक्कम आली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार होती, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणाचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी हा कथित प्रकार झाल्याचा दावाही करण्यात आला.

कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वादाला तोंड

यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिपमधील काही भाग ऐकवला. या संभाषणात 500 कोटी रुपयांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला. ही रक्कम श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यापर्यंत पोहोचल्याचे संभाषणात म्हटले असल्याचे वृत्त आहे. यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे सांगितले. क्लिप समोर येण्यामागचा हेतू काय, कोणाला लक्ष्य केले जात आहे आणि संभाषणाची सत्यता काय आहे, याची चौकशी आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत.  जरांगेच्या 500 कोटींचे आरोप आणि कथित ध्वनिफीत प्रकरणी एसआयटी गठित करा, असे या आदेशात म्हटले आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची भूमिका काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत, असे स्पष्ट केले. आरोप करण्यापूर्वी त्यांची शहानिशा करावी आणि पुरावे संबंधित यंत्रणांकडे द्यावेत, असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे, शिवसेनेच्या नेत्यांनी ऑडिओ क्लिपची सत्यता, आवाजांची ओळख आणि संभाव्य फेरफार यांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.

एसआयटी चौकशी झाल्यास पुढे काय होऊ शकते?

एसआयटी स्थापन झाल्यास किंवा संबंधित यंत्रणांनी सखोल तपास सुरू केल्यास ऑडिओचा मूळ स्रोत, संभाषणातील व्यक्तींची ओळख, ध्वनिमुद्रणाची सत्यता आणि कथित व्यवहाराशी संबंधित पुरावे तपासले जाऊ शकतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES