डिलिमिटेशन बिलावरून उद्धव ठाकरेंचा मास्टर गेम, 'त्या' 6 बंडखोर खासदारांना...; शिंदेंसह केंद्र सरकारला धक्का
संसदेत डिलिमिटेशन बिल मांडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला धक्का दिला आहे.
सोमवारी (30 नोव्हेंबर) ला केंद्रीय हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेशन बिल संसदेत मांडण्यात येणार आहे. डिलिमिटेशन बिलावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. या बिलावरून इंडिया आघाडीत फूट पाहिला मिळतेय. तर केंद्र सरकारही हे बिल पास झाले पाहिजे यासाठी आपल्याकडून सगळी रणनिती आखत आहेत. शरद पवार यांच्या पक्षातील एकही नेता हा इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थितीत नसल्याने पवारांचा बिलाला पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी डिलिमिटेशन बिलला विरोध दर्शविला आहे. त्यांनी डिलिमिटेशन बिल पास होण्यापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळी खेळली आहे. याच वर्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे.
त्यामुळे पुन्हा कुठलाही खासदार फुटू नये म्हणून व्हिप जारी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटलेल्या सहा खासदारांना देखील व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीचा शिंदे सेनेत गेलेल्या खासदारांविरोधात हा व्हिप आहे. दुसरीकडे हे प्रकरण कोर्टात आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांना पैसे देण्यात येत आहे, असा आरोप होते आहे. त्यामुळे हे व्हीप अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान आप आणि काँग्रेस पक्षाने व्हिप जारी केला आहे. उद्या नेमकं काय होणार हे पाहावे लागणार आहे.
हेसुद्धा वाचा - 'हे तर लबाड…', डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
असीम सरोदे यांनीही यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत म्हणाले की, मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार?
शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजप चे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली.
या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत.
त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा ल व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे.
आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील.