SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रातील दोन आमदारांना संपवण्याचा कट? एकाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न तर दुसऱ्याला हार्ट अटॅकचं...; खासदाराचा खळबळजनक दावा

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनाक्रमादरम्यान दोन आमदारांना संपवण्याचा कट होता असा आरोप खासदाराने पत्राकारांसमोर बोलताना केला आहे. या दोन आमदारांची नावंही सांगितली आहेत.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 12:48 IST | Updated: Nov 24, 2026, 13:11 IST
Image Credit: थेट दोन आमदारांची नावं सांगत करण्यात आला दावा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य सोशल मीडिया आणि 'रॉयटर्स'वरुन साभार)
Join

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या 2022 साली झालेल्या शिवसेनेतील बंडासंदर्भात एक हादरवून टाकणारा दावा सध्या सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याने केला आहे. या विधानावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना दोन आमदारांना ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप केलाय. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...

कोणता मंत्री काय म्हणाला?

शिवसेनेतील बंडादरम्यान सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचे ‘रामनाम सत्य’ झाले असते, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी एका पॉडकास्टदरम्यान काही दिवसांपूर्वी केला होता. या विधानानंतर ठाकरे गटाचे आमदार तथा शिवसेनेचे उपनेते नितीन देशमुख यांनी समोर येत आपणच ते आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच, "आपला काटा काढण्यासाठी कुणाला सुपारी देण्यात आली होती, याचे नाव संजय शिरसाट यांनी जाहीर करावे," अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पिस्तूल दाखवून...

इतकेच नव्हे, तर त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पिस्तूल दाखवून दबाव आणल्याचा गंभीर आरोपही नितीन देशमुख यांनी केला आहे. ‘तू जर जाशील तर मी स्वतः गोळी घालून घेईल,’ असे एकनाथ शिंदे म्हणाले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नंतर होईल; मात्र आपला जीव घेण्याचा कट कोण रचत होते, हे संजय शिरसाट यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी नितीन देशमुख यांनी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी 2022 मधील शिवसेनेच्या बंडादरम्यानचा घटनाक्रम सांगत शिंदे गट आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'या' आमदारावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

शिरसाट यांनी केलेल्या या दाव्यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी, "दोन आमदारांना ठार मारण्याचा कट होता," असं म्हटलं आहे. पुढे राऊत यांनी दोन आमदारांची नावंही घेतली आहेत. "प्रकाश आबिटकरही परत येवू इच्छित होते. नितीन देशमुख यांना हार्ट अटॅक येईल असं औषध देण्याचा प्रयत्न झाला," असं राऊत यांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता एका आमदारावर ट्रक घालण्याचा प्रयत्न होता असंही राऊत म्हणालेत. "कैलास पाटील यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला," असं राऊत यांनी पत्रकारांसमोर म्हटलं आहे. 

कोण ऐकतं मुख्य नेत्याचं?

राऊत यांनी पुढे बोलताना शिंदेंवर निशाणा साधत, "कुणी बाळासाहेबांचा फोटो फाडतात, कुणी असं बोलतं. कोण ऐकतं मुख्य नेत्याचं?" असा सवाल केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES