गोंदिया एअर होस्टेस मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! पोलिसांच्या हाती लागली हादरवणारी माहिती, प्रेमसंबंध सहन न झाल्याने 13 लाख...
पुणेकर एअर होस्टेस गोंदियाला माहेरी आल्यावर तिची हत्या झाली. या प्रकरणात मोठा ट्विस्ट असून अखेर हत्येचा उलगडा झाला आहे.
पुणेकर एअर होस्टेस वर्षा धुर्नलाल तुरकर हिचा मृतदेह 14 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगल परिसरात सापडल्याने खळबळ माजली होती. दिवाळीनिमित्त आपल्या तीन वर्षीय मुलीसह ती माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी ती मित्रासोबत फिरायला गेली असताना लुटमारीच्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शीनी भासवण्यात आले. त्यानंतर वर्षाच्या आई आणि पतीने वेगळाच संशय होता. त्यांनी पोलिसांकडे आरोप केला की, वर्षाची हत्या तिच्या मित्राने केली आहे. पण आता वर्षाच्या हत्येचा उलगडा झाला असून यात मोठा ट्विस आला आहे. वर्षाची हत्या मित्र, पती यांनी नाही तर एका वेगळ्या व्यक्तीने केली आहे. वर्षाची हत्या करण्यासाठी 13 लाखांची सुपारी देण्यात आली होती.
वर्षाच्या हत्येचा उलगडा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा ज्या मित्रासोबत फिरायला गेली होती तो नितेश अग्रवाल यांचे प्रेमसंबंध होते. नितेश आणि वर्षाचे हे प्रेमसंबंध नितेशच्या बायकोला सहन होत नव्हते. त्यामुळे तिने माहेरी आलेल्या वर्षाचा काटा काढण्याचा कट रचला. नितेश पत्नी मोना अग्रवाल हिने वर्षाची हत्या करण्यासाठी शेजारी राहणाऱ्या कुणाल श्यामलाल कुंभलकर याची मदत घेतली.
श्यामलालच्या मदतिने शाहरूख खान फिरोज खान पाठण याच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्याच्याला मोनी अग्रवाल हिने वर्षाला मारण्यासाठी 13 लाखांची सुपारी दिली. गोदिंया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे.
हेसुद्धा वाचा - लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुणेकर एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी
त्यांनी माहिती दिली की, हा हत्येचा थरार 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारस झाला. तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात वर्षा आणि नितेश फिरायला गेले होते, तिच संधी हत्येसाठी साधण्यात आली. चोरीच्या करायला असं भासवून वर्षाची धारदार शस्त्राने निर्घृणरित्या हत्या करण्यात आली.
या गुन्हाचा शोध लावण्यासाठी पोलिसांची 6 विशेष पथके तयार केली होती. प्रत्यक्षदर्शींकडून हत्या करण्याऱ्या आरोपींचे वर्णन नोट करण्यात आलं. त्याअनुषंगाने गोंदिया आणि शेजारील बालाघाट जिल्ह्यात शोधमोहीम घेण्यात आली. सलग चार दिवस तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी ते गोंदिया या मार्गावरील सुमारे 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अखेर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसल्यामुळे पोलिसांना मोठ यश हाती आलं. त्यानंतर पोलिसांनी या हत्येप्रकरणात पहिली अटक इम्रान करीम शेख केली. त्यानंतर पोलिसांच्या कसून चौकशीत शाहरूख पठाणने सुपारी दिल्याचे त्याने कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी शाहरूख, कुणाल कुंभलकर आणि कट रचणारी मोना अग्रवाल यांना अटक केली. पण अद्याप 2 आरोपी फरार आहेत.