• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी

लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी

पुण्यात राहणारी एअरहोस्टेस वर्षा तुरकर लेकीसोबत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माहेरी गेली होती. इथे जंगलात तिचा मृतदेह अत्यंत संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 11:52 AM IST|Updated: Nov 16, 2026, 11:56 AM IST
joinshare
लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी
Image Credit: pune air hostess varsha turkar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
विलासरावांच्या लेकाचा भाजपाला धक्का! धीरज देशमुखांनी मोठ्या विजयासहीत सत्ता राखली; देशमुख विरोधकाला मिळाली अवघी 2 मतं

विलासरावांच्या लेकाचा भाजपाला धक्का! धीरज देशमुखांनी मोठ्या विजयासहीत सत्ता राखली; देशमुख विरोधकाला मिळाली अवघी 2 मतं

2

लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी

3

महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल

4

IDBI बँकेने विक्रीपूर्वी 2 मालमत्तांची किंमत ₹2122 कोटींनी केली कमी; फेअरफॅक्सच्या व्यवहारासंदर्भात अनेक प्रश्न चर्चेत, नेमकं हे प्रकरण काय?

5

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल झाल्यावरही तब्बल 463 किमी धावली; रेल्वेकडून स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील धानोरी परिसरातील एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस विवाहित महिला दिवाळीच्या सुट्टी माहेरी गेली होती. तिथे जंगलात तिचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ माजली होती. 14 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगल परिसरात मृतदेह आढळला आहे. वर्षा आपल्या तीन वर्षीय मुलीसह माहेरी गेली होती.

मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुलीला आई-वडिलांकडे ठेवून ती मित्र नितेश नरेश अग्रवाल याच्यासोबत कारने बाहेर फिरायला गेली. अर्जुनी-बोंडराणी इथल्या वैनगंगा नदी काठावरील श्रीराम मंदिर परिसरातील जंगलात त्यांनी कार उभी थांबवली. संध्याकाळी 5.30 ते  6 च्या सुमारास  दोघे जंगलात बसून गप्पा मारत असताना तीन अज्ञात व्यक्ती आले. या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या दोघांना लुटमार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्यातील एका हल्लेखोराने वर्षा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती नितेशने वर्षांच्या कुटुंबीयांना दिली. या घटनेची कुणकुण लागताच खैरलांजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.

हेसुद्धा वाचा - भंडाऱ्यात रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थिनींना एसटीमधून खाली उतरवलं, नेमकं काय घडलं?

सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह...

वर्षाचं 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची एक गोंडस मुलगी आहे. वर्षा ही रविवारी पुण्याला परतणार होत्या, तत्पूर्वीच हा घातपात घडला. खैरलांजी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती गोंदिया पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांनी संयुक्तपणे तपासाची चक्रे वेगाने हलवली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाची देखील मदत घेतली जात आहे. याप्रकरणी मृत वर्षा यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र नितेश अग्रवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, घटना महाराष्ट्राच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास दवनीवाडा पोलिसांकडे वर्ग करण्याची तयारी सुरू आहे. 

एका कीर्तनकार महाराजांचा मृतदेह सापडला

दरम्यान रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेल्या एका कीर्तनकार महाराजांचा मृतदेह सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोन गायब असल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.41 वर्षीय देवेंद्र चैतन्य स्वामी तथा दौलत रामनाथ सातपुते महाराज असं मृतदेह आढळून आलेल्या महाराजांचं नाव आहे.ते मूळ नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव येथील रहिवासी आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Pune
Gondia