देवदर्शनाआधी काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार
अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाणाऱ्या कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघात एवढा भीषण होता यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आता सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोटला देवदर्शनासाठी हे कुंटुंब सकाळी कल्याणहून निघाले होते. दुपारी 3 च्या सुमारास मोहोळ तालुक्यात कंटेनरला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली, दरम्यान जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
झालेल्या या भीषण अपघातामध्ये पार्थ तुषार भारंबे या 8 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. विलास चांगु भारंबे (वय 66) आणि शोभा विलास भारंबे (वय 63, तिघेही रा. कल्याण) यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
हे ही वाचा
अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज
अपघाताचे नेमके कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे, या आपघातामध्ये झालेल्या मृत व्यक्तींची ओळख पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर कारण स्पष्ट होईल. धडक लागल्यानंतर जागीच तिघांचा मृत्यू झाला तर मृत आणि जखमी रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली त्यानंतर लगेचच मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांचा पुढील तपास या प्रकरणामध्ये सुरु आहे.