SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पावसाने दगा दिला, आता सरकारी बँकांवरही संकट? शेतकरी कर्जामुळे कशी वाढली बँकांची चिंता?

2026 च्या मान्सूनमध्ये देशात 13 टक्के कमी पाऊस झाल्याने सरकारी बँकांच्या कृषी कर्जावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेला याचा किती फटका बसू शकतो?

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 28, 2026, 21:49 IST | Updated: Nov 28, 2026, 22:09 IST
Image Credit: सरकारी बँक
Join

यंदा पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून आता त्याचे पडसाद बँकिंग क्षेत्रातही उमटण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, शेतीचे उत्पन्न घटले आणि परिणामी शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज फेडणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम सरकारी बँकांच्या आर्थिक कामगिरीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयसीआसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील परिस्थितीमुळे बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेवर तुलनेने अधिक दबाव येऊ शकतो. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

देशात सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पाऊस

2026 च्या जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा सुमारे 13 टक्के कमी पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, या काळात देशात 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पावसाचे प्रमाण 868.6 मिलिमीटर आहे. गेल्या दशकातील सर्वात कमी पावसाच्या हंगामांपैकी हा एक ठरला आहे. कमी आणि असमान पावसाचा परिणाम शेती उत्पादनावर झाला असून काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

बँकांवर अधिक दबाव

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाची कमतरता आणि शेतीवरील परिणाम अधिक गंभीर आहेत. या राज्यांमध्ये कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कर्ज देणाऱ्या बँकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेचा कृषी कर्जातील सहभाग तुलनेने अधिक असल्याने या दोन बँकांकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची परिस्थिती आगामी आर्थिक वर्षात महत्त्वाची ठरणार आहे.

कर्जाचे हप्ते थकल्यास बँकांचे नुकसान कसे?

शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी बँकांकडून पीककर्ज दिले जाते. मात्र, पाऊस कमी झाल्यामुळे उत्पादन घटले आणि शेतमालातून मिळणारे उत्पन्न कमी झाले, तर कर्जाचे हप्ते भरणे कठीण होते. अशा परिस्थितीत कर्जफेड लांबणीवर पडू शकते किंवा कर्ज थकीत होण्याचा धोका वाढतो. कॅनरा बँकेच्या देशांतर्गत एकूण कर्जापैकी 22.9 टक्के कर्ज कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील अडचणींचा बँकेच्या आर्थिक निकालांवर परिणाम होऊ शकतो.

बँकांच्या कमाईवर किती परिणाम होण्याचा अंदाज?

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पीककर्जांपैकी 35 टक्के कर्जांचे पुनर्गठन केल्यास काही बँकांच्या आर्थिक वर्ष 2026-27 मधील प्रति शेअर कमाईवर (EPS) 1 ते 4 टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा अंदाज व्यक्त केलाय.  या कर्जांचे पुनर्गठन करण्यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम लागू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अधिक वेळ?

शेतकऱ्यांवरील तातडीचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (SLBC) कडून कृषी कर्ज पुनर्गठनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पुनर्गठन म्हणजे कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक वेळ देणे किंवा हप्त्यांच्या अटींमध्ये बदल करणे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने हप्ता भरण्याचा दबाव कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES