SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

29 ऑक्टोबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे आजचे रेट्स

LPG Gas Cylinder 29 October 2026 : दिवाळीपूर्वी विविध अन्नपदार्थ बनवले जात असल्याने घरगुती सह व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते. 29 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 29, 2026, 08:45 AM IST | Updated: Oct 29, 2026, 09:34 AM IST
Image Credit: आजच्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती
Join

LPG Gas Cylinder 29 October 2026 : घराघरात दिवाळीनिमित्त खास चविष्ट पदार्थ बनवायला सुरुवात झालेली आहे. अशातच  LPG गॅस सिलेंडरच्या मागणीत मोठी वाढ होते. दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स जाहीर करतात. तेव्हा 29 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

मागच्या काही महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती मात्र सतत बदलत असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये  62.50 रुपयांची वाढ झाली. 


तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या आजच्या किंमती (14.2 किलोग्राम) :

दिल्ली    939.50 रुपये    
नोएडा    939.50 रुपये    
मुंबई           941.50 रुपये    
कोलकाता    968.00 रुपये    
पटना     1,031.50 रुपये    
बंगळुरू    944.50 रुपये    
नरसिंहपुर    969.50 रुपये    
सिंगरौली    972.50 रुपये    
अलीगढ़    960.00 रुपये    

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या आजच्या किंमती (19 किलोग्राम) :

दिल्ली    2,810.00 रुपये
नोएडा    2,747.50 रुपये
मुंबई         2,764.50 रुपये
कोलकाता    2,954.00 रुपये
पटना            3,100.50 रुपये
बेंगलुरु    2,764.00 रुपये
नरसिंहपुर  3,063.50 रुपये
सिंगरौली    3,064.00 रुपये
अलीगढ़    2,835.00 रुपये


 दिवाळीपूर्वी का वाढतात भाव :

दिवाळीच्या काळात मिठाईची दुकाने, स्टोअर्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो, ज्यामुळे व्यावसायिक एलपीजीचा वापरही वाढतो. त्याच वेळी, घराघरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात असल्याने घरगुती एलपीजी सिलिंडरची मागणीही वाढते. मागणीतील या तीव्र वाढीचा विचार करता आणि तेल कंपन्यांना आपला खर्च भरून काढण्याची गरज असल्याचे पाहता एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता बरीच जास्त असते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES