कराडमध्ये कोयना नदीपात्रात एक धक्कादायक व गूढ घटना उघडकीस आली आहे. नदीपात्रात जवळपास 35 हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. एका मृत कासवाजवळ पक्षी जमले अन् काहीच मिनिटांत पक्षी खासी कोसळले अन् तडफडू लागले. यातील काही पक्षांचा मृत्यू झाला तर काही पक्षी अत्यावस्थ स्थितीत स्थानिकांना आढळले आहेत. पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी वनविभागाची धावपळ सुरू असून. BHNS च्या शास्त्रज्ञांकडून तपासणी करण्यात येणार असून मृत पक्षी मुंबई आणि भोपाळला पाठवण्यात येणार आहेत.
सातारा - कराड येथील कोयना नदीपात्रात 35 हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या परिसरात मृत कासवाजवळ जमलेले ‘पिवळा धोबी’ Yellow Wagtail प्रजातीचे पक्षी काही मिनिटांतच जमिनीवर कोसळले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कराडमध्ये पक्ष्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे वनविभाग सतर्क झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठच्या परिसरात ‘पिवळा धोबी’ अर्थात (Yellow Wagtail) प्रजातीचे पक्षी वावरत होते. याच परिसरात एक कासव मृतावस्थेत आढळले होते. त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्या होत्या. या मृत कासवाजवळ पक्ष्यांचा थवा जमला होता.
मात्र, काही मिनिटांतच हे पक्षी अचानक जमिनीवर कोसळू लागले. कोणतीही स्पष्ट पूर्वलक्षणे दिसत नसताना 35 हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आता BHNS च्या शास्त्रज्ञांकडून तपासणी केली असून पक्ष्यांचा मृत्यू पाणी, निसर्गातील बदल की अन्य कारणाने झाला. यासाठी मृत पक्षी मुंबई आणि भोपाळला पाठवले जाणार आहेत.
सांगलीच्या कोरड्या नदीपात्रामध्ये पाणी दाखल झाले आहे,मात्र पाणी दाखल होताच पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कृष्णा नदीमध्ये पाणी पोहचताचं नदीपात्रात कारखान्यांकडून मळीमिश्रीत पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप प्राणीमित्रांकडुन करण्यात येत आहे,गेल्या दहा दिवसापासून कृष्णा नदी कोरडेठाक पडली होती.