• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6....; फलंदाजांचा कहर! ठोकले तब्बल 27 षटकार आणि 14 चौकार, 36 चेंडूत कुटल्या 135 धावा, ऑस्ट्रेलियाचा धुमाकूळ

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6....; फलंदाजांचा कहर! ठोकले तब्बल 27 षटकार आणि 14 चौकार, 36 चेंडूत कुटल्या 135 धावा, ऑस्ट्रेलियाचा धुमाकूळ

हाँगकाँग सिक्स 2026 स्पर्धेच्या अगदी पहिल्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगचा 28 धावांनी पराभव केला. कर्णधार मॅक्स ब्रायंटने अवघ्या 12 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 30, 2026, 08:48 AM IST|Updated: Oct 30, 2026, 08:51 AM IST
joinshare
6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6....; फलंदाजांचा कहर! ठोकले तब्बल 27 षटकार आणि 14 चौकार, 36 चेंडूत कुटल्या 135 धावा, ऑस्ट्रेलियाचा धुमाकूळ
Image Credit: ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगचा 28 धावांनी पराभव केला

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं', निलेश राणेंनी दिला इशारा, 'तुझी लायकी किती, तू....'

2

'उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, दोघे...', माजी खासदाराचं विधान; एकत्र येण्याचं कारणही सांगितलं

3

त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात महत्त्वाची बातमी! 2 दिवस मंदिर भाविकांसाठी असणार बंद, काय आहे कारण?

4

'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

5

'असा अपमान केला तर...,' आमने-सामने वादावर वंदना गुप्तेंनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या.. 'लीना-मंगेश तुम्ही अचानक...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगविरोधातील सामन्यात धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाने फक्त सहा ओव्हर्समध्ये तब्बल 135 धावा ठोकल्या. कर्णधार मॅक्स ब्रायंटने अवघ्या 13 चेंडूंत 56 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात, हाँगकाँगचा संघ केवळ 107 धावाच करू शकला. स्ट्रेलियाने हाँगकाँगचा 28 धावांनी पराभव केला. 'हाँगकाँग सिक्स 2026' स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे.

हा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. कर्णधार मॅक्स ब्रायंटसोबत निक हॉब्सनने 12 चेंडूंत 40 धावा केल्या, तर ख्रिस ग्रीननेही आक्रमक फलंदाजी करत 10 चेंडूंत 36 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात चौकारांपेक्षा षटकारांची संख्या अधिक होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एकूण 18 षटकार आणि 5 चौकार लगावले.

यजमान हाँगकाँगला सुरुवातीलाच धक्के बसले आणि पहिल्या सात चेंडूंतच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार यतीम मुर्तझा याने 13 चेंडूंत 32 धावा केल्या, तर नसरुल्ला राणाने 10 चेंडूंत 30 धावांचे योगदान दिले. या आक्रमक खेळीनंतरही, हाँगकाँगचा संघ 107 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

27 षटकार, 14 चौकार

हाँगकाँग सिक्स स्पर्धेत एका डावात केवळ सहा ओव्हर्स असतात. या सामन्यांत ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँगच्या फलंदाजांनी मिळून 27 षटकार आणि 14 चौकार लगावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या नियमांनुसार, एखादा फलंदाज 50 धावा पूर्ण करतो, तेव्हा त्याला 'रिटायर आऊट' व्हावे लागते. म्हणजेच 50 धावा पूर्ण केल्यानंतर तो पुढे फलंदाजी करू शकत नाही.

हाँगकाँगच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी घाम काढला. बाबर हयातने एका षटकात 29 धावा दिल्या, तर एजाज खानने आपल्या षटकात 27 धावा दिल्या. त्याचप्रमाणे, एहसान खानने 6 चेंडूंमध्ये 24 धावा दिल्या. याउलट, कर्णधार यासिम मुर्तझाने अचूक गोलंदाजी करत आपल्या षटकात केवळ 10 धावा दिल्या.

1 नोव्हेंबरपर्यंत चालणार स्पर्धा

ही स्पर्धा आज, 30 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 1 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारताला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत 'ग्रुप सी'मध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ आज आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News