• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

चक्रीवादळामुळं पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घेऊयात.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 06:57 AM IST|Updated: Nov 02, 2026, 06:59 AM IST
joinshare
ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट
Image Credit: rain alert in maharashtra

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
उड्डाण घेताच विमानाचा अपघात, गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले विमान, 9 ठार, काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह Video

उड्डाण घेताच विमानाचा अपघात, गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले विमान, 9 ठार, काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह Video

2

शाळेत विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातल्या गोळ्या, म्हणाले 'त्याने...'

3

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

4

आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2026 : सोमवारी कालाष्टमीसह लक्ष्मी योग! वृषभ राशीचे कर्ज होणार मंजूर, तर या लोकांनी घाई करणे पडेल महागात

5

कोकणात दुष्काळ; महाराष्ट्रात अत्यंत भयानक परिस्थिती

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अर्णब चक्रीवादळानंतर भारताच्या किनारपट्टीवर आणखी एक वादळ घोंगावतंय. मुरासू चक्रीवादळामुळं राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झालं आहे. त्यामुळं राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरील  तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रविवारी चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ 3 नोव्हेंबर रोजी आंध प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर आणि झंझावाताचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

मोसमी पावसाच्या हंगामानंतर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यात 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 95 टक्के इतकी पावसाची तूट निर्माण झाली आहे.

वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाख

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात अचानक आलेल्या परतीच्या पावसाने आणि ताशी 40 ते 60 किमी वेगाने सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने एकच दाणादाण उडवून दिली आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या हलक्या सरींमुळे चिपळूण, संगमेश्वर आणि खेडसह अनेक तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. दरम्यान,तोंडाशी आलेले भात पीक कापणीच्या मार्गावर असतानाच या पावसाचे थैमान सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.

येवल्यात मध्यरात्री मुसळधार अवकाळी पाऊस

नाशिकच्या येवल्यात मध्यरात्री मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, निफाड ,सिन्नर परिसरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लावली. सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather News
Weather
Maharashtra News