महाराष्ट्र दुष्काळ : कोकणातील बळीराजावर निसर्गाचा दुहेरी घाला पडला आहे. कोकणाचं प्रमुख पीक असलेल्या भाताच्या मळणीला जागोजागी सुरुवात झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशा आली आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न निम्म्यावर आले असून लोंब्यांमध्ये दाण्यांऐवजी पोळ भरल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे यंदा केवळ धान्याचीच नव्हे, तर जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पेंढा कमी पडल्याने गोशाळांसमोर आणि पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोकणातील शेतांमध्ये सध्या भात कापणी आणि मळणीची लगबग सुरू आहे. मात्र यंदा या शेतकऱ्यांमध्ये उत्साह नसून केवळ चिंता दिसतेय. . शेतात कापून ठेवलेलं पीक घरी नेण्याऐवजी शेतकरी थेट बांधावरच मळणी उरकत आहेत. लोंब्यांमध्ये दाण्यांचे प्रमाण अत्यल्प असून अर्ध्याहून अधिक पोळ निघत आहे. भातासोबतच पारंपरिक नाचणी आणि वरी पिकांचेही गणित बिघडले असून मजुरीचा खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.
यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ धान्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. पावसाअभावी भाताची वाढ नीट न झाल्याने पेंढ्याचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. परिणामी, बाजारात आणि गावागावांत जनावरांच्या चाऱ्याचा मोठा शॉर्टेज निर्माण झाला आहे. शेतकरी स्वतःच्या गुरांसाठी पेंढा साठवताना मेटाकुटीला आले आहेत, तर दुसरीकडे मोठ्या संख्येने गोवंश सांभाळणाऱ्या गोशाळांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
दुष्काळ आमि पावसाच्या दग्या फटक्यामुळे "एकीकडे धान्य गेले आणि दुसरीकडे गुरांचा चाराही हिरावला गेला. शेतीसाठी घेतलेला खर्च, मजुरांचा रोज आणि आता जनावरांच्या पोटाची खळगी भरण्याची चिंता, अशा तिहेरी कात्रीत कोकणातील शेतकरी अडकला आहे. तोट्यात गेलेल्या या शेतीतून आता कुटुंब कसे चालवायचे आणि मुक्या जनावरांना कसे जगवायचे, या चिंतेने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
दुष्काळी जालन्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी सुरू झाली आहे. इस्लामवाडी येथील टेकडीवरून ड्रोनच्या साहाय्याने क्लाऊड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. सुमारे 400 मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यातील शेतीचं अर्थकारण दुष्काळाने पूर्णपणे कोलमडलं आहे. पावसाअभावी पिकांची खुंटलेली वाढ आणि हातातून गेलेलं उत्पादन यावर आता प्रशासनाच्या सुधारित पैसेवारीनेही शिक्कामोर्तब केलं आहे.जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांतील ७९३ महसुली गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली