SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'एका जागेच्या हव्यासापोटी...', पदवीधरच्या सर्व जागांवर पराभवाने भाजपाचा संताप; शिंदेंच्या शिवसेनेवर खापर फोडत गंभीर आरोप

भारतीय जनता पार्टीकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला असून अगदी नाव घेऊन टीका करण्यात आली आहे. भाजपाने नेमकं काय म्हटलं आहे या पराभवानंतर विश्लेषण करताना जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 29, 2026, 09:49 AM IST | Updated: Oct 29, 2026, 10:11 AM IST
Image Credit: शिंदेंच्या शिवसेनेला सुनावलं (प्रातिनिधिक फोटो)
Join

महाराष्ट्रात पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पदवीधरच्या सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. मात्र या पराभवाचं खापर आता भाजपाकडून मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर फोडलं आहे. पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याबरोबरच महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष केशव उपाध्येंनी शिंदेंच्या सेनेला सुनावलं आहे. 

एकत्रित लढलो असतो तर...

"पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोनवर का थांबलो याचा विचार करणार आहोत का?" असा सवाल केशव उपाध्येंनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये #आत्मचिंतन #महायुती हे दोन हॅशटॅग वापरले आहेत. 

पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना...

तर दुसरीकडे नवनाथ बन यांनी आपल्या एक्स पोस्टमधून शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत," असं बन यांनी म्हटलं आहे. 

अब्दुल सत्तार यांनी तर थेट...

तसेच, "छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही," असं बन यांनी आपल्या पोस्टमधून शिंदेंच्या शिवसेनेला सुनावताना म्हटलं आहे. 

महायुतीला निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आहे. राज्यात झालेल्या पाच जागांच्या निवडणुकीपैकी शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांवर भाजपाला विजय मिळवता आला असला तरी सुशिक्षित मतदार असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. पुण्यामधून हर्षदा जाधव-देशमुख निवडून आल्या असून त्यांनी भाजपाच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी 18 वर्षांपासूनची महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची सत्ता संपुष्टात आणली आहे. आता या निकालांसाठी भाजपाने थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर खापर फोडल्याने शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES