SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

NEET पेपरफुटी रोखण्यासाठी निलेकणींचा मास्टर प्लॅन

नीट पेपरफुटी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने इन्फोसिसरचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्यस्तरीय कृती समिती स्थापन केली होती. पेपरफुटी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासात होण्यासाठी या समितीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 14, 2026, 12:00 PM IST | Updated: Oct 14, 2026, 12:10 PM IST
Image Credit: नीट पेपरफुटी रोखण्यासाठी निलेकणींचा मास्टर प्लॅन
Join

नीट पेपरफुटीवरून मागील काही काळापासून मोठा वाद निर्माण झाला आहे. नीट युजी परीक्षेचा पेपर फुटल्याने कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. परफुटी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने इन्फोसिसरचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्यस्तरीय कृती समिती स्थापन केली होती. पेपरफुटी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासात होण्यासाठी या समितीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करणे, एआयची मदत तसेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे आणि अशा ऑनलाइन परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना या मास्टर प्लॅनमध्ये असल्याचे संकेत नंदन निलेकणी यांनी दिले आहेत.

नीट परीक्षा व्यवस्थेतील आगामी बदलांबाबत दिले संकेत :

एका कार्यक्रमात बोलतना निलेकणी यांनी पेपरफुटी रोखणे तसेच 'नीट' परीक्षा व्यवस्थेतील आगामी बदलांबाबत संकेत दिले. निलेकणी यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या पद्धतीतच बदल करण्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, एकाच प्रश्नपत्रिकेची गरज काय? प्रश्नपत्रिका तथार झाली की ती विकून पैसे कमावण्याचा मोह होतो. त्यामुळे आधीच प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी प्रश्नांचा मोठा संग्रह तयार करावा आणि अगदी शेवटच्या क्षणी त्या दिवसाची प्रश्नपत्रिका तयार करणे हा उपाय ठरू शकतो, त्यामुळे विकण्यासाठी प्रश्नपत्रिका उपलब्धच राहणार नाही, असे निलेकणी म्हणाले. एआयचीदेखील मदत घेणार प्रश्नपत्रिका तयार करताना एआवची मदत घेण्यावाक्त निलेकणी म्हणाले की, नक्कीच एआयची मदत घेता येऊ शकते. अनेक मुद्दे आहेत, ज्यावर समिती विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे निलेकणी म्हणाले.

सर्व परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व परीक्षा संगणक-आधारित चाचणीद्वारे घेतल्या पाहिजेत. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा झाल्यास पेपरफुटीची शक्यता राहणार नाही. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणावर नेटवर्क कनेक्टिव्हिटीची गरज आहे. सध्या अशी दीड लाख परीक्षा केंद्रे आहेत. ही संख्या वाढवण्याची गरज आहे, असे निलेकणी म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES